BJP Maharashtra : बावनकुळेंचे प्रदेशाध्यक्षपद निश्चित! फक्त घोषणेची प्रतिक्षा

Chandrakant Patil यांची मंत्रीमंडळात वर्णी लागल्याने फेरबदल अपेक्षित
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankulesarkarnama

पुणे : माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे भाजपचे प्रदेशाध्यक्षपद निश्चित झाल्याचे सांगण्यात येत असून पुढील चोवीस तासांत याबाबत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्वतः बावनकुळे या विषयावर बोलायला नकार दिला. या विषयी पुण्यात पत्रकारांनी प्रश्न विचारताच ते उत्तर न देता निघून गेले. (Chandrashekhar Bawankule is front runner for BJP state president post)

Chandrashekhar Bawankule
सुरेश खाडेंना जयंत पाटलांचा हिशोब चुकता करण्याची संधी!

भाजप राज्यात सत्तेवर आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आहेत. तसेच गेल्या दहा वर्षांत भाजपचा प्रदेशाध्यक्ष ओबीसीमधून झालेला नाही. सुधीर मुनगंटिवार यांची मुदत 2013 मध्ये संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यांच्यानंतर रावसाहेब दानवे आणि त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे सूत्रे आले. भाजपचा ओबीसी हा मोठा पाठीराखा आहे. मात्र प्रमुख पदांवर त्यांच्यातील नेते नाहीत, असा संदेश जाऊ नये म्हणून बावनकुळे यांचे नाव आघाडीवर आहे.

Chandrashekhar Bawankule
LIVE Maharashtra Cabinet Expansion : विखे पाटील पाॅवरफुल्ल : महसूल आणि सहकार खाते

बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणाच्या वेळी भाजपची भूमिका आक्रमकपणे मांडली. तसेच 2019 मध्ये त्यांचे विधानसभेचे तिकिट कापल्यानंतरही ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले आणि संघटनेचे काम करत राहिले. त्यानंतर त्यांना नुकतेच विधान परिषदेवर घेण्यात आले. आता त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे जाणार आहेत. याचाच अर्थ जे बावनकुळे स्वतःचे तिकिट 2019 मध्ये मिळवू शकले नाहीत, त्यांच्यकडे आता तिकिटवाटपाची जबाबदारी येणार आहे, असे मानले जात आहे.

Chandrashekhar Bawankule
राधाकृष्ण विखे पाटील सातव्यांदा शपथबद्ध : ६ मुख्यमंत्र्यांसोबत काम करण्याचा अनुभव गाठीशी

या पदासाठी आशिष शेलार यांचे नाव काही माध्यमांमध्ये चालविण्यात येत होते. पण ते मुंबईचे असल्याने आणि आता या पदासाठी मराठा चेहरा देणे योग्य नसल्याने देखील शेलार यांचे नाव शर्य़तीत नव्हते. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांची मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याने शेलार यांच्याकडे मुंबईची सूत्रे येण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेची आगामी काळात निवडणूक असल्याने शेलार यांचा उपयोग तेथे जास्त होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com