पवार हे कठोर परिश्रम करणारे व प्रचंड जनसंपर्क असलेले नेते - पृथ्वीराज चव्हाण

पवार हे कठोर परिश्रम करणारे व प्रचंड जनसंपर्क असलेले नेते - पृथ्वीराज चव्हाण
Published on
Updated on

सातारा : छत्रपती शिवाजीराजांच्या विचाराचा खरा पाईक, हार्ड वर्किंग लिडर, मॅन ऑफ स्ट्रॅटेजी, राजकीय आणि सामाजिक जिवनाची चालती बोलती शाळा अशा विविध शब्दांत गौरव करत राज्यातील दिग्गज नेत्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्व व कृतृत्वाचे विविध पैलू उलगडत त्यांच्या कार्याला सलाम केला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांचा सत्कार जावळी तालुक्‍यातील शेतकरी मारुतराव गोपाळ निकम व पत्नी इंदुमती निकम या दांपत्याच्या हस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन करण्यात आला. तसेच जिल्हा परिषदेच्यावतीने अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी तर खासदार उदयनराजे भोसले, कॉंग्रेसच्यावतीने पृथ्वीराज चव्हाण तर शिवसेनेच्यावतीने आमदार शंभूराज देसाई यांनी श्री. पवार यांचा सत्कार केला. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार निवेदिता माने, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सर्वपक्षीय आमदार व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी प्रथम खासदार झाल्यावर पहिल्यांदा पवार साहेबांना पाहिले. संसदेत काम करताना त्यांच्याशी जवळून संबंध आला. मनमोहनसिंग यांच्या सरकारमध्ये आम्हाला एकत्र काम करत आले. अनेक नेत्यांना पाहिले पण इतका कठोर परिश्रम करणारा नेता पहिला नाही. प्रचंड संपर्क असलेला नेता आहे. त्यांच्या राजकीय जीवनात त्यांनी अनेक निर्णय धाडसाने घेतले. खिल्लारी भूकंपावेळी सेनापतीप्रमाणे ते तळ ठोकून थांबले होते. ग्रामीण विकासाचे बारामती मॉडेल त्यांनी बनविले. ते पाहण्यासाठी आजही देशातून लोक येतात. कारण तेथे पवारसाहेबांचे नेतृत्व महत्वाचे आहे. 
अलिकडे राजकारणात नवीन समीकरणे उदयास येत आहेत. पण त्या त्या वेळेला पवार साहेबांचे मत घेतल्याशिवाय कुठलेच गणित सुटणार नाही, हे मात्र, तेवढेच महत्वाचे आहे. 

विजय शिवतारे म्हणाले, ग्रामीण महाराष्ट्राच्या उन्नतीचे श्रेय पवार साहेबांना आहे. सियाचिनसारख्या ठिकाणी सैन्याचे अधिकारी जाण्यास कचरतात तेथे संरक्षण मंत्री असताना पवार साहेब गेले होते. साहेब मी तुमचा पहिला चेला आहे, राजकारणात तुम्ही मला मोठे केले. जिथे आधिकारी पोचत नाहीत तेथे पवार साहेब पोचतात, हा त्यांचा संवेदनशीलपणा आहे. मोदी बारामतीत येऊन काय बोलले हे मी सांगणार नाही. देशाची फ्रेमवर्क तयार करण्याचे काम त्यांनी केले. काय हे अजब रसायन आहे. आता पवार साहेबांनी पंतप्रधान व्हावे हीच आमची इच्छा आहे. पवारसाहेब वडील आणि पितृत्वाच्या नात्याने मी तुमच्याकडे पाहतो आहे. या नेत्याला शिवसेनेच्यावतीने शुभेच्छा. 

महादेव जानकर म्हणाले, पवारसाहेब तुमचे मी स्वागत करतो. तुम्ही आमदार झाला आणि माझा जन्म झाला. मी एक कार्यकर्ता आहे. तुमच्यावर बोलण्याइतपत मी मोठा नाही. तुमची जिद्द, चिकाटी, मेहनत याचा आम्हाला अभिमान आहे. सातारच्या मातीचा गंध ज्याच्या अंगाला लागला तो माणूस देशात मोठा होतो. नांदवळ मुळे तुम्ही राष्ट्रीय नेता झाला. राष्ट्रीय समाज पक्षातर्फे तुमच्या राजकीय वाटचालीस शुभेच्छा. 

यावेळी सुनील तटकरे यांचे भाषण झाले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव पाटील, विक्रमसिंह पाटणकर, आमदार शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, नरेंद्र पाटील, दीपक चव्हाण, आनंदराव पाटील, प्रभाकर घार्गे, शंकर गोडसे, अशोक गायकवाड, चंद्रकांत खंडाईत, यांच्यासह विविध पक्षांचे मान्यवर उपस्थित होते. 
 

पवारांना स्वतःच्या पक्षात शत्रू अधिक..! 
रामराजेंनी प्रास्ताविकात शरद पवार यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. शरद पवार ही व्यक्ती काय आहे, याचा पट उलगडून दाखविला. ते म्हणाले, शरद पवार ज्या पक्षात असतात त्या पक्षात त्यांचे शत्रू अधिक आणि मित्र कमी असतात. मात्र, विरोधी पक्षात त्यांचे शत्रू कमी आणि मित्र अधिक आहेत, अशी परिस्थिती आहे. 

मानसिंग भोसलेंनी लक्ष वेधले  
शिरगांव तालुका वाई येथील मानशिंग भोसले हे सत्काराच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीच्या पक्षाचे चिन्ह असलेला पेहरावा केला होता, तो सर्वांचा लक्ष वेधत होता. 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com