बबनराव लोणीकरांचे बोलणे आक्षेपार्हच : चित्रा वाघ

पोलिसांकडे आयपीसी, सीआरपीसीसह सर्व कायदे आहेत. सुमोटोअंतर्गत काय करायचे, कुणावर काय गुन्हे नोंद करायचे याचे सर्व अधिकार पोलिस प्रशासनाला आहेत. ते जे योग्य वाटेल ते करतील. ज्या महिलेविरुद्ध लोणीकर बोलले आहेत, त्या महिलेची कशी तक्रार असेल त्यापद्धतीने कारवाई होईल. त्यात कुणी पुढे येईल असे मला वाटत नाही.'' असेही त्या म्हणाल्या.
बबनराव लोणीकरांचे बोलणे आक्षेपार्हच : चित्रा वाघ

औरंगाबाद : परतूर विधानसभा मतदार संघाचे माजी मंत्री व आमदार बबनराव लोणीकरांनी एका कार्यक्रमात व्यासपीठावर केलेले वक्तव्य आक्षेपार्हच आहे. त्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. या सर्व गोष्टी सुमोटोअंतर्गत येतात, त्यामुळे महिला आयोगही या प्रकरणाची निश्‍चितपणे दखल घेईल अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केली. 

जालना जिल्ह्यात घडलेल्या छेडछाडीच्या प्रकरणानंतर त्या रविवारी (ता. 2) औरंगाबादेत विशेष पोलिस महानिरीक्षकांना निवेदन देण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. एकप्रकारे त्यांनी लोणीकर यांना घरचा आहेरच दिला आहे. परतूर तालुक्‍यातील वीज उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात बबनराव लोणीकर यांचे आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल झाले. शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपयांची नुकसान भरपाई हवी असेल तर मोठा मार्चा काढावा लागेल. मोर्चासाठी कुणाला आणू हे तुम्ही सांगा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आणु का प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आणू की एखादी हिरोईन आणू..जर हिरोईन मिळाली नाही तर आपल्या स्टेजवर बसलेल्या तहसीलदार मॅडम हिरोईनच आहेत. त्याही हिरोईनसारख्या दिसतात. असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. 

विशेष म्हणजे या वक्तव्याचे समर्थन करणारा त्यांचाच एक व्हिडीओ पुढे आला. त्यात ते माझ्या वाक्‍याचं भांडवल करू नका, हिरॉईन या शब्दाचा अर्थ डॅशिंग आणि कर्तबगार महिला असा होतो. हिरॉइन शब्दाचा अपमान करु नका असे म्हणत ते त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. याविषयी चित्रा वाघ म्हणाल्या, ""पक्ष कोणताही असो कोणत्याही नेत्याने भाषणाच्या ओघात, बोलण्याच्या भरात अथवा अगदी गमतीतही शब्दांचा प्रयोग करताना सावधगिरी बाळगायला हवी. नीटपणे मोजून मापून शब्द बोलायला हवेत. लोणीकरांनी केलेल्या वक्तव्याचे मी समर्थन करणार नाही. ते जे बोलले ते आक्षेपार्हच आहे. अशा घटनांचे कुणीही समर्थन करणार नाही.'' असे त्या म्हणाल्या. या प्रकरणाची दखल घ्यावी अशी विनंती महिला आयोगाला करणार आहात का या प्रश्‍नावर त्या म्हणाल्या, ""या सर्व गोष्टी सुमोटो अंतर्गत येतात. त्यामुळे महिला आयोगही यात निश्‍चितपणे दखल घेईल. 

पोलिसांकडे आयपीसी, सीआरपीसीसह सर्व कायदे आहेत. सुमोटोअंतर्गत काय करायचे, कुणावर काय गुन्हे नोंद करायचे याचे सर्व अधिकार पोलिस प्रशासनाला आहेत. ते जे योग्य वाटेल ते करतील. ज्या महिलेविरुद्ध लोणीकर बोलले आहेत, त्या महिलेची कशी तक्रार असेल त्यापद्धतीने कारवाई होईल. त्यात कुणी पुढे येईल असे मला वाटत नाही.'' असेही त्या म्हणाल्या. 

महानिरीक्षकांना निवेदन 
नेत्या चित्रा वाघ यांच्यासह भाजपचे आमदार अतुल सावे, आमदार संतोष दानवे, ऍड. माधूरी आदवंत, अनुपमा पाथ्रीकर यांच्या शिष्टमंडळाने विशेष पोलिस महानिरीक्षक रविंद्र सिंगल यांची रविवारी भेट घेतली. जालनातील गोंदेगाव येथे घडलेल्या प्रकरणात पोलीस अधिक्षकांचे निलंबन करावे. घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्यात सायबर ऍक्‍ट लावला नव्हता तो लावावा. ज्या-ज्या वॉटसऍप ग्रूपमधून हा व्हिडीओ व्हायरल झाला, त्या-त्या ग्रूपच्या ऍडमीनवर कारवाई करावी अशा मागण्या त्यांनी सिंगल यांच्याकडे शिष्टमंडळाने केल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com