गायीला वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मध्यरात्री भर रस्त्यात धावपळ; व्हिडीओ व्हायरल

रस्त्यात वाहनांचा ताफा थांबवून लोकांच्या मदतीला धावून जाणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख होऊ लागली आहे.
Cow Rescue
Cow Rescue
Published on
Updated on

चंदीगड : पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर चरणजित सिंग चन्नी (CharanJit singh Channi) यांनी अनेकांची मने जिंकली आहे. रस्त्यात वाहनांचा ताफा थांबवून लोकांच्या मदतीला धावून जाणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख होऊ लागली आहे. आता त्यांच्या या दातृत्वाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रविवारी मध्यरात्री खड्डयात पडलेल्या गायीला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री धावून गेल्याने त्याचे कौतुक होत आहे.

सोशल मीडियात मुख्यमंत्री चन्नी यांच्या या कृतीची जोरदार चर्चा सुरू आहे. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता असून अमरिंदरसिंग यांच्या राजीनाम्यानंतर काही महिन्यांपूर्वीच चन्नी मुख्यमंत्री बनले आहेत. रविवारीची घटना समोर आल्यानंतर चन्नी यांच्याविषयी लोकांच्या मनात आपुलकीची भावना वाढत असल्याचा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

Cow Rescue
वानखेडे अॅक्शन मोडवर; नांदेडमध्ये दोन ठिकाणी छापेमारी

रविवारी मध्यरात्री मुख्यमंत्री घरी निघाले होते. एका ठिकाणी रस्त्यात त्यांना मोठी गर्दी पाहायला मिळाली. तिथेच मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबतो. एका खड्डयात गाय पडल्याचे त्यांना दिसून आले. गायीला वर येता येत नसल्याने दोरीच्या सहाय्याने वर काढावे लागणार होते. त्यासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेत उपस्थितांना सुचना देण्यास सुरूवात केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

मुख्यमंत्री चन्नी यांनी हातात बॅटरी घेत मदतही केली. दोरीच्या सहाय्याने गायीला वर काढण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आनंदही व्यक्त केला. मुख्यमंत्री तिथून जाताना ‘तुला वाचवलं आहे, काळजी घे,’ असं म्हणाल्याचे स्थानिक पत्रकार मन अमन सिंग चिन्ना या पत्रकाराच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सुमारे 20 मिनिटांचा हा व्हिडीओ आहे.

चन्नी यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.सुमारे 17 हजारांहून अधिक जणांनी व्हिडीओ पाहिला असून शेकडो जणांनी शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओला हजारो लाईक्सही मिळाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री चन्नी यांनी रस्त्यात थांबून गरजूंना मदत केल्याचे फोटो व्हायरल झाले होते. एका लग्नाच्या वरातीतही ते सहभागी झाले होते. त्यांच्या या कृतीमुळे त्यांची लोकप्रियता वाढत असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com