
मुंबई : अधिवेशनाचे आज सूप वाजले. शेवटचे भाषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत होते. सर्वजण कान टवकारून हे भाषण ऐकत होते, अन् अचानक एका
चिमुरडीचा आवाज सभागृहात घुमला. सभागृहातील सर्व सदस्य व मंत्रीगण एकमेकांकडे पाहू लागले. नक्की आवाज कुठून येतोय हे कुणालाच कळेना. एवढ्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मोबाईलमधून हा आवाज येत असल्याचे लक्षात आले.
पृथ्वीराजबाबांनी मोबाईलमध्ये पाहीले तर त्यांची लहान नात व्हीडीओ कॉलमधून बोलत होती. व्हीडीओ कॉल कसा हाताळायचा हे बाबांच्या लक्षात येत नव्हते. त्यातूनच त्यांनी तो कॉल अनवधानाने उचलला होता, अन् काही केल्या त्यांना तो बंद करता येईना. फडणवीस यांनीही आपले भाषण काही क्षण थांबविले. "तंत्रज्ञानाचे बरेच फायदे असतात. पण अनेकदा अशा अडचणीही येतात" अशी मिश्किल टिप्पणी फडणवीस यांनी टेक्नॉसॅव्ही असलेल्या बाबांना उद्देशून केली. शेवटी बाजूला बसलेल्या सदस्यांनी हा कॉल बंद करण्यास बाबांना मदत केली. तोपर्यंत सभागृहात चांगलाच हंशा पिकला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.