जेएनयू प्रकरणी कॉंग्रेस व भाजपचे परस्परांवर आरोप सुरू

दरम्यान, कॉंग्रेस प्रवक्ते अजय माकन यांनी दिल्ली पोलिसांवर जोरदार टिकास्त्र सोडले. पोलिसांचा तपासच संशयास्पद आहे. त्यांच्यावर राजकीय दबाव असल्याचे यावरून स्पष्ट दिसते. त्यामुळे दिल्ली पोलिस आयुक्तांची आणि जेएनयू कुलगुरुंची तातडीने हाकलपट्टी करावी, अशी मागणी माकन यांनी केली. दिल्ली पोलिस, जेएनयू प्रसासन केंद्राच्या अखत्यारित आहे. व्हिडीओ पुराव्यांमध्ये आईशी घोष काहीही करताना दिसत नाही. हा व्हिडीओ देखील अभाविपने प्रसिद्ध केला होता
जेएनयू प्रकरणी कॉंग्रेस व भाजपचे परस्परांवर आरोप सुरू
Published on
Updated on

नवी दिल्ली : जेएनयूमधील हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 9 विद्यार्थ्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजपने या मुद्‌द्‌यावर डाव्या विचारांच्या संघटनांना लक्ष्य केले आहे. तर, कॉंग्रेसने विद्यार्थी संघटनांची पाठराखण करताना जेएनयूच्या कुलगुरुंसोबतच दिल्ली पोलिस आयुक्तांनाही पदावरून हटवावे, अशी मागणी केली आहे. 

दिल्ली पोलिसांनी हिंसाचारातील संशयितांची नावे आज दुपारी जाहीर केली होती. ही सर्व नावे डाव्या पक्षांशी संबंधित विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांची आहेत. यानिमित्ताने केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी डाव्या पक्षांवर तोफ डागली. डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी यात सहभागी होते, हे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. पाच दिवसांपासून सुरू असलेल्या खोटारडेपणाचा पर्दाफाश झाला आहे. माकप, भाकप, आप सारक्‍या पक्षांना जनतेने लोकसभा निवडणुकीत नाकारले. आता ते स्वार्थासाठी विद्यार्थ्यांचा वापर करत आहेत. पोलिसांनी सत्य समोर आणले आहे. डाव्या संघटनांनी आधीच हिंसेची योजना आखली होती. त्यासाठीच सीसीटीव्ही कॅमेरे खराब करण्यात आले आणि सर्व्हरची देखील तोडफोड करण्यात आली, असा दावा जावडेकर यांनी केला आहे. 

दुसरीकडे, केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी "डाव्यांचा बुरखा फाटला', असे ट्विट केले. मनुष्यबळ खात्याच्या माजी मंत्री असलेल्या इराणी यांनी, जेएनयूमध्ये डाव्यांचे मनसुबे उधळल्याचा दावा केला. डाव्यांनी अराजकतेचे नेतृत्व करून करदात्यांच्या पैशातून उभारलेली सरकारी संपत्ती नष्ट केली. आता पोलिसांच्या पुराव्यांमुळे हिंसेतील डाव्यांचा सहभाग समोर आला आहे. 

दरम्यान, कॉंग्रेस प्रवक्ते अजय माकन यांनी दिल्ली पोलिसांवर जोरदार टिकास्त्र सोडले. पोलिसांचा तपासच संशयास्पद आहे. त्यांच्यावर राजकीय दबाव असल्याचे यावरून स्पष्ट दिसते. त्यामुळे दिल्ली पोलिस आयुक्तांची आणि जेएनयू कुलगुरुंची तातडीने हाकलपट्टी करावी, अशी मागणी माकन यांनी केली. दिल्ली पोलिस, जेएनयू प्रसासन केंद्राच्या अखत्यारित आहे. व्हिडीओ पुराव्यांमध्ये आईशी घोष काहीही करताना दिसत नाही. हा व्हिडीओ देखील अभाविपने प्रसिद्ध केला होता. दिल्ली पोलिसांचे वर्तन फक्त केंद्रीय मंत्र्यांना खुश करणारे आहे. भाजपचे मंत्री त्यांच्याच पक्षाचे नेते डॉ. मुरलीमनोहर जोशी यांच्या मागणीवर उत्तर का नाही देत, असाही सवाल माकन यांनी केला. 


 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com