सिद्धरामय्यांचे कुमारस्वामींना आव्हान...तर मी राजकारणातून संन्यास घेईन

येडियुरप्पा आणि सिद्धरामय्या यांची गुप्त भेट झाल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
H.D.Kumaraswamy and Siddaramaiah
H.D.Kumaraswamy and Siddaramaiah File Photo
Published on
Updated on

बंगळूर : प्राप्तिकर विभागाने (Income Tax) माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पांचे (B.S.Yediyurappa) स्वीय सहाय्यकावर छापे टाकले होते. यामुळे येडियुरप्पा अडचणीत आल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर येडियुरप्पा आणि काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांची गुप्त भेट झाल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी (H.D.Kumaraswamy) यांनी केला आहे. यावर सिद्धरामय्यांनी कुमारस्वामींना आव्हान दिले आहे.

सिद्धरामय्या यांनी कुमारस्वामींचे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, माझी अशी कोणती गुप्त भेट झाल्याचे सिद्ध केल्यास मी राजकारणातून संन्यास घेईन. मी येडियुरप्पांच्या वाढदिवशी 27 फेब्रुवारी 2020 रोजी एकदा भेटलो होतो. मुख्यमंत्री अथवा विरोधी पक्षनेता म्हणून मी त्यांना भेटलो असून, व्यक्तिगतरीत्या आजपर्यंत भेटलो नाही. कोरोना झाल्यानंतर आम्ही दोघेही एकाच रुग्णालयात दाखल होतो. तेव्हाही आमची भेट झाली नव्हती. कुमारस्वामी धादांत खोटे बोलत आहेत.

धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच.डी.कुमारस्वामी यांनी मोठा गौप्यस्फोट करून राजकीय भूकंप घडवला आहे. येडियुरप्पा आणि सिद्धरामय्या यांची गुप्त भेट झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, येडियुरप्पा आणि सिद्धरामय्या यांची गुप्त भेट झाली होती. या भेटीची माहिती भाजप नेतृत्वाला मिळताच येडियुरप्पांच्या निकटवर्तीयावर छापे टाकण्यात आले. येडियुरप्पांना नियंत्रणात ठेवण्यासाठी नेतृत्वाने ही खेळी खेळली. या भेटीची माहिती देण्यासाठी सिद्धरामय्या हे दिल्लीला गेले होते. त्यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली होती.

H.D.Kumaraswamy and Siddaramaiah
कर्नाटकात राजकीय भूकंप! येडियुरप्पा अन् सिद्धरामय्यांची गुप्त भेट

मागील काही दिवसांपासून येडियुरप्पा हे भाजपला अडचणीत आणण्याची तयारी करीत असल्याची चर्चा आहे. भाजपने नेतृत्वाने त्यांचे पुत्र बी.वाय.विजयेंद्र यांना सुरवातीला मंत्रिमंडळात स्थान दिले नव्हते. नंतर राज्यात हनगळ आणि सिंदगी या विधानसभा पोटनिवडणुकांसाठी प्रभारी म्हणून विजयेंद्र यांचा समावेश करण्यात आला नव्हता. याबद्दल येडियुरप्पांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर लगेचच विजयेंद्र यांनी प्रभारी करण्यात आले होते. येडियुरप्पांच्या राज्य यात्रेलाही भाजपने विरोध केला आहे. आता येडियुरप्पांच्या पीएवर छापे पडल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

H.D.Kumaraswamy and Siddaramaiah
मोठी बातमी : केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला न्यायालयाचा दणका

येडियुरप्पांचा आवाज दाबण्यासाठीच हे छापे टाकण्यात आल्याचे कुमारस्वामी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. कुमारस्वामी म्हणाले होते की, येडियुरप्पा आणि त्यांचे पुत्र विजयेंद्र यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी हे छापे टाकण्यात आले. ते दोघे काही तरी करतील, अशी भीती भाजप नेतृत्वाला आहे. यामुळे त्यांना रोखण्यासाठी भाजप नेतृत्वाने हे पाऊल उचलले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com