बाळासाहेब देसाई हे 'पोलादी पुरूष', त्यांना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवले गेले!

बाळासाहेब देसाईंचा वारसा आमदार शंभूराज देसाई समर्थपणे चालवत आहेत.
बाळासाहेब देसाई हे 'पोलादी पुरूष', त्यांना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवले गेले!
Published on
Updated on

मोरगिरी (पाटण-सातारा) : ज्या व्यक्तीने महाराष्ट्र घडवण्यामध्ये प्रमुख भूमिका निभावली, त्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे स्मारक करण्यासाठी इतका वेळ लागण्याची आवश्यकता नव्हती. सरदार वल्लभभाई पटेल यांना पंतप्रधानपदापर्यत जाता आले नाही आणि तिच परस्थिती आमच्या महाराष्ट्रातील पोलादी पुरूषांच्या बाबतीत झाली आहे. सर्व क्षमता असताना लोकनेते बाळासाहेब देसाई हे मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवले गेले, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. 

दौलतनगर, ता. पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या 'महाराष्ट्र दौलत' या शताब्दी स्मारकाच्या पहिल्या टप्याचे उदघाटन, दुसऱ्या टप्याचे भूमीपूजन फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. 

बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री विजय शिवतारे,खासदार उदयननराजे भोसले, आमदार शंभुराज देसाई  उपस्थित होते.  

फडणवीस म्हणाले,  ज्या व्यक्तीने महाराष्ट्र घडवण्यामध्ये प्रमुख भूमिका निभावली. आधुनिक महराष्ट्राचा इतिहास ज्या व्यक्तीशिवाय पूर्ण होवू शकत नाही. अश्या बाळासाहेब देसाई यांचे स्मारक करण्यासाठी इतका वेळ लागण्याची आवश्कता नव्हती. त्यांच्यावर राजकीय अन्याय करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांना प्रचलित राजकारणामुळे पंतप्रधानपदापर्यत जाता आले नाही. आणि तिच परस्थिती आमच्या महाराष्ट्रातील पोलादी पुरूषांच्या बाबतीत आहे. सर्व क्षमता असताना लोकनेते बाळासाहेब देसाई हे मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवले गेले. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com