मोठी बातमी : लॉकडाउनमध्येही पंतप्रधान मोदींच्या वाराणसी मतदारसंघात दारू दुकाने राहणार खुली

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. उत्तर प्रदेशातही रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने लॉकडाउन लावण्यात आला आहे.
during lockdown liquor shops will be open in varanasi in uttar pradesh
during lockdown liquor shops will be open in varanasi in uttar pradesh
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशात कोरोना (Covid19) संसर्गाची दुसरी लाट आली आहे. उत्तर प्रदेशातही (Uttar Pradesh) रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने लॉकडाउन लावण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वाराणसी (Varanasi) मतदारसंघात मात्र, निर्बंध असतानाही राज्य सरकारने आज दारु दुकांने (Liquor Shops) सहा तासांसाठी उघडली. यामुळे मद्यपींची या दुकानांसमोर गर्दी उसळली. 

राज्यातील कोरोनाचा कहर कमी करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कडक पावले उचलली आहेत. वाराणसी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू असून, ती 17 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. यातून औद्योगिक कारखाने, हार्डवेअर दुकाने आणि सरकारी बांधकामांना मुभा आहे. याचबरोबर डेअरी, भाज्या, फळे विक्री दुकाने, मिठाई दुकाने आणि दारुच्या दुकानांनाही सवलत आहे. यामुळे वाराणसीमध्ये आज सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेत दारू दुकाने उघडण्यात आली होती.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात कोरोनाचे 2 लाख 25 हजार 271 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात 12 लाख 83 हजार 754 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 15 हजार 742 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 72 टक्के दहा राज्यांमध्ये आहेत. यात उत्तर प्रदेशचाही समावेश आहे. 

देशात 24 तासांत 3 हजार 876 मृत्यू 
देशातील कोरोना रुग्णांची संख्याही सोमवारी कमी झाली आहे. सोमवारी 24 तासांत देशात 3 लाख 29 हजार 942 रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 2 कोटी 29 लाख 92 हजारांवर पोहचला आहे. तर 24 तासांत 3 हजार 876 मृत्यू झाले असून एकूण मृत्यूचा आकडा जवळपास अडीच लाखांवर पोहचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. महाराष्ट्रासह चार ते पाच राज्यांतील कोरोना रुग्णांचे देशातील प्रमाणच जवळपास 50 टक्के आहे. त्यामध्ये रविवारपर्यंत महाराष्ट्र आघाडीवर होता. 

सोमवारी नव्याने आढळून आलेल्या रुग्णसंख्येत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर गेला. राज्यात 24 तासांत सुमारे 37 हजार रुग्ण आढळले. महाराष्ट्राच्यापुढे कर्नाटक गेले असून काल 39 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. त्यानंतर तमिळनाडू सुमारे 29 हजार, केरळ 27 हजार आणि उत्तर प्रदेश 21 हजार ही पाच राज्ये देशातील सर्वात संक्रमित राज्य आहेत.

भारताने कोरोना रुग्णांचा एक कोटींचा टप्पा मागील वर्षी 19 डिसेंबर रोजी ओलांडला होता. तर दोन कोटींचा टप्पा केवळ साडे चार महिन्यांत ओलांडला आहे. दुसऱ्या लाटेमध्ये मार्च व एप्रिल महिना खूपच घातक ठरला. या कालावधीत देशातील मृतांचा आकडाही वेगाने वाढला आहे. भारताने आता अमेरिका व ब्राझील या देशांनाही मागे टाकले आहे. त्यामुळे देशासमोरील चिंता अधिकच वाढत चालली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com