सातारच्या दोन्ही राजांना अखेर 'राजमाने' भेटले, त्यांनी 'मपोसे'ची ताकद दाखवली!

शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजे यांना जायला सांगा, मगच मी जातो, असे सांगितल्यावर पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांचा पारा चढला.
सातारच्या दोन्ही राजांना अखेर 'राजमाने' भेटले, त्यांनी 'मपोसे'ची ताकद दाखवली!
Published on
Updated on

सातारा: देशी दारूचे दुकान काढण्यावरून खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोघे आज एकमेकांसमोर उभे राहिले. दोन्ही राजेंनी आक्रमक भूमिका घेतल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता होती. यावेळी पोलीस कुमक घेवून दाखल झालेल्या उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी आपल्या वर्दीची ताकद दाखवून दिली.

समीर खुटाळे यांच्या जुना मोटार स्टँड येथील जागेत नगरसेवक रवी ढोणे यांचे देशी दारूचे दुकान भाड्याने आहे.रवी ढोणे हे आमदार शिवेंद्रसिंहराजे कार्यकर्ते आहेत. हे दुकान काढण्यासाठी उदयनराजेंचे काही लोक आले होते. नंतर खासदार उदयनराजे भोसले घटनास्थळी आले. त्याची माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मिळाली. ते जावलीतून आपल्या कार्यकर्त्यांस घटनास्थळी आले. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन वातावरण चिघळू नये म्हणून कार्यकर्त्यांना पोलिसानी पिटाळून लावले. तर काहींना लाठीचा प्रसादही मिळाला. 

पोलीस उपअधीक्षक राजमाने (मपोसे) यांनी सुरवातीला दोन्ही राजांना समजावून सांगितले. पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी ते संतापले आणि शिवेंद्रसिंहराजे यांना वरच्या स्वरात म्हणाले, मला कायदा हातात घ्यायला लावू नका. मलाही गाडी चालविता येते. त्यांच्या गाडीतील कार्यकर्त्याना खाली उतरवून पोलीस निरीक्षक सारंगकर यांना गाडीत बसून शिवेंद्रसिंहराजे यांना गाडी घेऊन जावा, असे सांगितले.
 
शिवेंद्रसिंहराजे यांनी खासदार जाणार नाहीत, तो पर्यंत मी जाणार नाही असे सांगितले. त्यानंतर राजमाने खासदार उदयनराजे भोसले यांच्या गाडीकडे गेले व खालच्या स्वरात महाराज साहेब तुमचीही गाडी जाऊ द्यात, असे म्हणाले. या नंतर महाराजांची गाडी उत्तरेकडे तर आमदारांची गाडी दक्षिणेकडे गेली. यानंतर पोलिसांनी बघे व कार्यकर्ते यांना हाकलले तसेच काहींना लाठीचा प्रसाद दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com