Eknath Khadse Political strategy
Eknath Khadse Political strategySarkarnama

Eknath Khadse: टायगर अभी जिंदा है! नाथाभाऊंनी दाखवून दिलं

Eknath Khadse Political strategy North Maharashtra Politics Raksha Khadse: रोहिणी खडसे यांना प्रदेश महिला काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाले. दुसरीकडे एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे या मात्र भाजपच्या खासदार भाजपमध्ये निष्ठेने काम करीत राहिल्या.

Jalgoan News: रक्षा खडसे यांनी खासदारकीची हॅट्रीक केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीत राजकीय मुत्सद्देगिरी दाखवून आपले नेतृत्व आजही कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

भारतीय जनता पक्षातील अंतर्गत वादात एकेकाळी पक्षात दबदबा असलेल्या एकनाथ खडसे याना पक्षातून बाहेर पडावे लागले. त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.त्याच्यासोबत त्यांच्या कन्या अँड. रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनीही प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली. रोहिणी खडसे याना प्रदेश महिला काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाले.दुसरीकडे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या सून रक्षा खडसे या मात्र भाजपच्या खासदार भाजपमध्ये निष्ठेने काम करीत राहिल्या.

खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार असल्याने लोकसभेत रक्षा खडसे यांना भाजप उमेदवारी देणार नसल्याचे संकेत दिसत होते. त्या वेळी एकनाथ खडसे यांनी चाणाक्षपणे आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून रावेर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार आहोत, अशी घोषणा केली. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी केल्यास जळगाव व रावेर येथील पक्षाच्या दोन्ही जागांना फटका बसू शकतो. हे पक्ष नेतृत्वाच्या लक्षात आले. शिवाय रक्षा खडसे यांना उमेदवारी नाकरावी, असे कोणतेही सबळ कारण पक्षाकडे नव्हते. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करून भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली.

रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकनाथ खडसे यांचा पहिला डाव सफल झाला. त्यानंतर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहिल्यास सुनेच्या प्रचार करण्यास अडचण निर्माण होईल हे लक्षात येताच त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन आपण भाजपमध्ये जात असल्याची घोषणा केली. आपल्याला केंद्रीय नेत्यांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या घोषणेमुळे भाजपचे राज्यातील नेतेही अचंबित झाले होते. परंतु एकनाथ खडसे आपल्या निर्णयावर ठाम होते.

Eknath Khadse Political strategy
Bajrang Sonawane: वडील मारतील, बायको नाश्ता देणार नाही, असे बीडचे 'बाप्पा'का म्हणाले...

केंद्रातील नेत्यांच्या उपस्थितीत आपला प्रवेश होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी आपल्या प्रवेशाचा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर सोपविला. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत रावेर लोकसभा मतदारसंघात आपल्या सूनबाई रक्षा खडसे यांचा प्रचारही सुरू ठेवला. मात्र या दरम्यान ते भाजपच्या व्यासपीठावर न जाण्याचा चाणाक्षपणाही त्यांनी दाखविला.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात असलेल्या त्यांच्या कन्या अँड.रोहिणी खडसे यांनी याच लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार करून पर्यायाने आपल्या भावजय विरुद्ध प्रचार केला.

लोकसभा निवडणुकीत रावेर लोकसभा मतदार संघात रक्षा खडसे विजयी झाल्या. मात्र तो पर्यंतही एकनाथ खडसे यांचा भाजपत प्रवेश झालाच नव्हता.त्यानंतर बोलताना एकनाथ खडसे यांनी आपल्याला आता भाजप प्रवेशाची घाई नसल्याचे सांगितले. परंतु सूनबाई खासदार रक्षा खडसे यांच्या मंत्रिमंडळात समावेश होण्याचे संकेत दिसताच त्यांनी आपला लवकरच पक्षात प्रवेश होईल, असे सांगितले.

रक्षा खडसे यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले, याचा एकनाथ खडसे यांनी आनंद व्यक्त केला शपथविधी सोहळ्यास ते दिल्लीत उपस्थित राहिले. मात्र आजही त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला नाही. मात्र सूनबाई रक्षा खडसे यांनी पक्षाची उमेदवारी मिळवून देण्यापासून त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्यापर्यंत एकनाथ खडसेंची रणनिती यशस्वी झाली. खडसेंची ही राजकीय मुत्सद्देगिरी पाहिली असता 'टायगर अभी जिंदा है' असेच म्हणाले लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com