Eknath Shinde News : ठाकरे पुरून उरले; आता एकनाथ शिंदेंसाठी पुढची लढाई नाही सोपी...

BJP Eknath Shinde alliance : मुंबईत बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यातच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत मराठी अस्मितेचा मुद्दा अजेंड्यावर आणला.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai election result : ठाणे, कल्याण-डोंबिवलीप्रमाणे शिवसेनेला मुंबईत आपला जम बसवता आला नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात कायम असते. या वेळी मुंबई महापालिकेच्या निकालात हे प्रकर्षाने दिसून आले. मुंबईत ९० जागा लढवलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला विजयाचा ‘स्ट्राइक रेट’ राखता आला नाही.

ठाकरे गटाच्या गोटातून फोडलेल्या ६२ नगरसेवकांपैकी केवळ २९ उमेदवारांना विजय मिळवता आला; मात्र शिवसेनेला सोबत घेतल्याचा फायदा शिंदेंऐवजी भाजपला जास्त झाल्याचे चित्र आहे. मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा घोळ शेवटपर्यंत कायम होता; उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने शिवसेनेला ९० जागा सोडल्या. या जागांवरून मुंबईतील मोठा भाऊ आता छोटा भाऊ ठरल्याचे स्पष्ट झाले होते.

दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळे सर्वांत पहिला धोका होता, तो म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेपुढे; मात्र मुंबई पालिकेच्या निकालात शिंदे यांचा पक्ष अपेक्षित कामगिरी करू शकला नाही; मात्र मराठी मतांमध्ये काहीअंशी फूट पडून त्याचा फायदा भाजपला झाल्याचे चित्रही या निकालातून समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला सोबत घेतले नसते तर कदाचित भाजपला अपेक्षित यश मिळाले नसते, हेदेखील या निकालातून अधोरेखित झाले आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
BMC Mayor : मुंबईत महापौर कोण? ‘या’ नावांपैकी एक फिक्स, CM फडणवीस देणार धक्का?

ठाकरेंची पकड मजबूत

मुंबईत बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यातच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत मराठी अस्मितेचा मुद्दा अजेंड्यावर आणला. शिंदेंनी ठाकरे गटाच्या अनेक नाराजांना गळाला लावले होते. तरीही त्यांना मुंबईत अपेक्षित यश न मिळाल्याने मुंबईत ठाकरेंचीच पकड मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
BMC Election Result : मुंबईत पहिल्यांदाच असं घडलं अन् सर्वात मोठे 'ते' दोन फॅक्टर फेल; फडणवीस-शिंदेंनी निवडणूक फिरवली...

भविष्यातील वाट बिकट

मुंबई महापालिकेतील सत्ता ठाकरे यांच्या हातून निसटली. विधानसभा निवडणुकीतही ठाकरेंचे १० आमदार निवडून आले होते, तर शिंदेंचे सहा आमदार होते. त्याआधी लोकसभा निवडणुकीतही ठाकरेंनी तीन खासदार निवडून आणत आपली ताकद दाखविली होती. शिंदेना केवळ एकच तोही अत्यंत कमी फरकाने खासदार निवडून आणता आला होता. आता पालिकेतही ठाकरेंच्या तुलनेत शिंदे गटाची सुमार कामगिरी झाली आहे. त्यामुळे भविष्यात मुंबईत शिंदेंची वाट बिकट दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com