संप सुरुच ठेवण्याचा नाशिकला निर्धार सरकार - समन्वयकांकडू फसवणूकीची तक्रार

भाजप नेत्यांना बंदीया बैठकीस भाजपचे खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे यांसह भाजपचे विविध नेते उपस्थित होते. मात्र त्यांचे कोणीही ऐकुण घेतले. त्यांना बोलु दिले तर चुकीचा संदेश जाईल व सरकारकडे चुकीचे माहिती दिली जाऊ शकते असा आक्षेप शेतक-यांनी घेतल्याने हे नेते काही वेळ उपस्थित राहून परतले.
संप सुरुच ठेवण्याचा नाशिकला निर्धार  सरकार - समन्वयकांकडू फसवणूकीची तक्रार

नाशिक:  सरसकट कर्जमाफीसह बांधावर येऊन घोषणा करेपर्यंत शेतकरी संप सुरुच राहील. समन्वय समिती आणि सरकारने संपात फूट पाडण्यासाठी फसव्या आश्‍वासनांद्वारे खेळी केली अशी तक्रार आज येथे झालेल्या शेतकरी प्रतिनिधींच्या बैठकीत केली. त्यामुळे संप अधिक नेटाने सुरु ठेवण्याची घोषणा करीत नाशिकमध्ये संप सुरुच राहील अशी घोषणा येथे झाली. 

आज पहाटे मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत शेतकरी संप मागे घेण्यात येत असल्याची घोषणा सोशल मिडीया, दुरचित्रवाणी वाहिन्यांवर झाली. त्यानंतर लगेचच त्याच्या प्रतिक्रीयाही उमटल्या. संप मागे घेण्याच्या निर्णयाला शेतक-यांनी निरोध करीत सोशल मिडीयावर तीव्र प्रतिक्रीया उमटल्या.

सकाळी अकराला नाशिक बाजार समितीच्या आवारात शेतक-यांची बैठक झाली. यामध्ये जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार, चंद्रकांत बनकर, आणदार जे. पी. गावित, अनिल धनवट, हंसराज वडघुले, गिरधर पाटील, करण गायकर यांनी संप मागे घेण्याच्या बातम्या अफवा आहेत.

सरकारने अशा प्रकारे संप फोडण्याचा प्रयत्न केल्याचा निषेध करीत कोणत्याही स्थितीत संपुर्ण मागण्या मान्य केल्या जात नाहीत तो पर्यंत संप मागे न घेण्याचे जाहीर केले. त्याला सर्वच शेतक-यांनी घोषणा देत पाठींबा दिला. उद्या (ता.4) दुपारी चारला बाजार समितीत पुन्हा बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्याचे जाहीर केले. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी घोषणा देत बाजार समितीतील व्यापा-यांचा माल फेकुन दिला. 

दिंडोरीत रास्ता रोको
दरम्यान आज सकाळी आंबे घेऊन जाणारा टेम्पो महिलांनी अडवला व चौफुलीवर रास्ता रोको केला. यावेळी टेम्पो चालकाने हे आंबे दुस-या वाहनातून नेण्याचा प्रयत्न केल्यावर संतप्त महिला व शेतक-यांनी हे आंबे रस्त्यावर फेकुन देत घोषणा दिल्या. त्यानंतर अर्धा तास गुजरातकडे जाणा-या नाशिक- दिंडोरी रस्ता बंद झाला होता. वणी येथेही सापुतारा चौफुलीवर रास्ता रोको झाला. त्यानंतर या रस्त्यावर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. 

निफाडमध्ये जोर कायम
आज सकाळी संप मागे घेतल्याची घोषणा योगेश रायते या समितीतील सदस्यांनी व्हाटस्‌ऍवर केली. मात्र त्यानंतर तीव्र प्रतिक्रीया उमटल्याने त्यांनी फोन बंद केला. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर नैताळे येथे औरंगाबाद महामार्गावर संतप्त शेतकऱ्यांनी घोषणा देत संपाची त्वीरता वाढवली. गोण्यांतील बटाटे रस्त्यावर फेकुन दिले. यार जाळून समितीचा निषेध केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com