निवृत्त झाल्यानंतर आठवड्याच्या आतच सुनील अरोरांना राज्यपालपदाची लॉटरी?

मुख्य निवडणूक आयुक्त पदावरुन याच महिन्यात पायउतार झालेल्या सुनील अरोरा यांना राज्यपालपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
former cec sunil arora may be appointed as governor of goa
former cec sunil arora may be appointed as governor of goa
Published on
Updated on

कोलकता : मुख्य निवडणूक आयुक्त पदावरुन याच महिन्यात पायउतार झालेल्या सुनील अरोरा यांना राज्यपालपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. अरोरा यांनी त्यांच्या कार्यकाळात पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक आठ टप्प्यांत घेण्याचा वादग्रस्त ठरला आहे. यावरुन अद्याप गदारोळ सुरू आहे. तसेच, त्यांनी भाजपला कायम झुकते माप दिल्याचा आरोप विरोधकांनी वारंवार केला होता. 

अरोरा यांच्या जागी मुख्य निवडणूक आयुक्तपदी आता सुशील चंद्रा यांची नियुक्ती झाली आहे. अरोरा हे राजस्थान केडरचे आयएस अधिकारी होते. ते २०१६ मध्ये केंद्रीय माहिती सचिव पदावरुन निवृत्त झाले होते.  त्यानंतर त्यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी वर्णी लागली होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भाजपला झुकते माप दिल्याचा आरोप विरोधकांनी कायम केला आहे. 

आता अरोरा यांना गोव्याच्या राज्यपालपदाची लॉटरी लागणार असल्याचे समजते. गोव्याचे राज्यपालपद बऱ्याच काळापासून रिक्त आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याचा अतिरिक्त कार्यभार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी वाद झाल्यामुळे केंद्र सरकारने तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांना दहाच महिन्यांत तेथून बाजूला हटवले होते. मलिक हे आधी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. 

मागील लोकसभा निवडणुकीत वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या भाजप नेत्यांवर कारवाई करण्यात आखडता हात घेतल्याचा आरोप अरोरा यांच्यावर झाला होता. याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अरोरा यांनी भाजप नेत्यांवर वादग्रस्त वक्तव्ये केल्याप्रकरणी कारवाई केली नाही, अशीही टीका होत आहे. अरोरा १३ एप्रिलला निवृत्त झाले असून, त्यांचा निवृत्त होण्याआधीचा शेवटचा आदेश ममतांवरील प्रचारबंदीचा होता. त्यांचा हा आदेश वादग्रस्त ठरला होता. 

प्रचारसभेमध्ये ममतांनी मुस्लिमांच्या मतदानासंदर्भात वक्तव्य आणि सीआरपीएफविरोधात विद्रोह करण्याचे आवाहन लोकांना केल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यानुसार निवडणूक आरोगाने ममतांना नोटीस बजावली होती. नंतर आयोगाने ममतांवर कारवाईचा निर्णय घेतला होता. आयोगाने 24 तास ममतांना प्रचारास मनाई केली होती. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ममतांना मोठा झटका बसला होता. 

Edited by Sanjay Jadhav 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com