गडचिरोली-चिमूर : विद्यमान आमदारांच्या परिश्रमाची कसोटी

नक्षलवाद्यांच्या धमकीनंतरही गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात यंदाही मतदारांचा मतदानाला भरघोस प्रतिसाद मिळाला. आपल्या मर्जीतील उमेदवार न दिल्याने भाजप व कॉग्रेस पक्षातील नेत्यांत कुरकूर सुरू होती, ती मतदानाच्या दिवसापर्यंत बघायला मिळाली, त्यामुळे निवडणूक निकालानंतर विद्यमान आमदारांच्या परिश्रमाची कसोटी लागणार आहे. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुकांनी मतदारांशी जवळीक साधण्याची संधी मिळवली.
गडचिरोली-चिमूर : विद्यमान आमदारांच्या परिश्रमाची कसोटी

गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या धमकीनंतरही गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात यंदाही मतदारांचा मतदानाला भरघोस प्रतिसाद मिळाला. आपल्या मर्जीतील उमेदवार न दिल्याने भाजप व कॉग्रेस पक्षातील नेत्यांत कुरकूर सुरू होती, ती मतदानाच्या दिवसापर्यंत बघायला मिळाली, त्यामुळे निवडणूक निकालानंतर विद्यमान आमदारांच्या परिश्रमाची कसोटी लागणार आहे. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुकांनी मतदारांशी जवळीक साधण्याची संधी मिळवली.
 
अहेरी विधानसभा क्षेत्रात आगामी निवडणुकीत पुन्हा राजा, बाबा व दादा एकमेकासमोर येणार आहेत. त्यादृष्टीने माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी जोरदार तयारी चालवली आहे तर माजी आमदार दीपक आत्राम यांना भाजपच्या तिकिटाचे वेध लागल्याची चर्चा आहे. पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्याबद्दल नाराजीचा सूर असल्याने त्याचा फायदा ते घेऊ इच्छित आहे. 

गडचिरोली विधानसभा क्षेत्रात कॉग्रेसकडून विश्‍वजित कोवासे गुडघ्याला बांशिंग बांधून आहेत तर लोकसभेची तिकीट नाकारलेले डॉ. नितीन कोडवते हेही तयारीत आहे. भाजपकडून आमदार डॉ. देवराव होळी तसेच प्रकाश गेडाम हे दोन नेते स्पर्धेत आहेत. 

आरमोरी विधानसभा क्षेत्रात कॉग्रेसकडून नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्‍यता आहे. माजी आमदार आनंदराव गेडाम प्रयत्नात आहे; मात्र, कॉग्रेसच्या एका गटाकडून त्यांना विरोध आहे. भाजपकडून क्रिष्णा गजबे वा शिवसेनेचे डॉ. रामकृष्ण मडावी यांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे. 

ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात आमदार विजय वडेट्टीवार यांचे तिकीट पक्के मानले जाते. भाजप अतुल देशकरांचेच कार्ड चालवते की नवीन चेहरा म्हणून संदीप गड्डमवार, याबाबत चर्चा सुरू आहे. 

चिमूरमध्ये पुन्हा एकदा भंडी भांगडीयांना संधी मिळेल, असे वाटते. पण, तेथेही तिकिटासाठी इच्छूकामध्ये चुरस राहणार आहे. 

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव क्षेत्रात विद्यमान आमदार संजय पुराम आहेत. पण येथे भाजप व कॉग्रेसकडून नव्या चेहऱ्याला संधी मिळेल, अशी चर्चा आहे. 

लोकसभा ठरविणार उमेदवारी 
लोकसभेची निवडणूक आटोपली मात्र आता राजकीय नेत्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. प्रचाराची धुरा नेत्यांवर सोपविण्यात आली होती. ज्या क्षेत्रातून भाजप व कॉंग्रेस उमेदवाराला मताधिक्‍य कमी पडेल. त्याची दखल पक्षक्षेष्ठीकडून घेतली जाणार आहे. त्यामुळे सर्व इच्छुकांचे धाबे दणाणले आहे. त्यांच्या कामगिरींचाही विचार केला जाणार आहे. 

- भाजपकडून निष्क्रिय आमदारांना डावलणार. 
- कॉग्रेसमध्ये तिकिटासाठी पुन्हा रस्सीखेच 
- गटबाजीमुळे भाजप, कॉग्रेस नेते संभ्रमात 
- आरमोरीत शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई 
- अहेरीत दोन राजे पुन्हा मैदानात 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com