पवारांच्या भेटीनंतर ममतांचा दोनच आठवड्यांत डाव! राष्ट्रवादीचं एका राज्यातलं अस्तित्व संपवलं

ममता बॅनर्जी या दोन आठवड्यापूर्वी मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.
Goa NCP MLA Churchill Alemao joins TMC. 

Goa NCP MLA Churchill Alemao joins TMC. 

Sarkarnama

Published on
Updated on

पणजी : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव केल्यानंतर तृणमूल काँग्रेसने (TMC) राष्ट्रीय पातळीवर विस्तारासाठी आक्रमक पावले उचलली आहेत. पुढील वर्षी गोव्यात विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) होत आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर ममता बॅनर्जींच्या (Mamata Banerjee) गोव्यात दाखल झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राज्यातील एकमेव आमदाराला फोडून त्या पक्षाचे राज्यातील अस्तित्व संपवले आहे.

ममता बॅनर्जी या आक्रमकपणे गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत उतरल्या आहेत. तृणमूल काँग्रेस गोव्यात सर्व 40 जागा लढवणार आहे. ममता आता गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वी ममता या मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. यानंतर दोनच आठवड्यात त्यांनी पवार आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गोव्यातील एकमेव आमदार चर्चिल अलेमाव (Churchill Alemao) यांना त्यांनी फोडले आहे.

अलेमाव यांनी आज विधानसभा अध्यक्षांकडे राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे तृणमूलमध्ये विलिनीकरण करावे, असे पत्र दिले. पक्षाचा मी एकमेव आमदार असून, विधिमंडळ पक्षाचे 100 टक्के प्रतिनिधित्व करतो. यामुळे हे विलीनीकरण घटनात्मकदृष्ट्या वैध आहे, असा युक्तिवादही अलेमाव यांनी केला आहे. अलेमाव हे बेनोलिम मतदारसंघाचे आमदार आहेत. ममतांच्या उपस्थितीत आज त्यांनी कन्येसोबत तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. अलेमाव हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या तृणमूल प्रवेशाने गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे.

<div class="paragraphs"><p>Goa NCP MLA Churchill Alemao joins TMC.&nbsp;</p></div>
सचिन वाझे कशी करायचा वसुली? पोलीस अधिकाऱ्यांनीच केला गौप्यस्फोट

काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री लुईजिन्हो फलेरो यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. ते गोवा काँग्रेसचे दिग्गज नेते मानले जात होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांना गोव्यात समन्वय समितीचे अध्यक्ष करण्यात आले होतं. पण त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं पक्षाला धक्का बसला होता. पुढील वर्षी गोव्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. यापाश्वर्भूमीवर तृणमूल काँग्रेसकडून गोव्यातील निवडणूक लढवली जाणार आहे. फलेरो यांच्यासारखा बडा नेता पक्षाच्या गळाला लागला आहे.

<div class="paragraphs"><p>Goa NCP MLA Churchill Alemao joins TMC.&nbsp;</p></div>
अर्णव गोस्वामींच्या अटकेमागील गुपित अखेर वाझेनं केलं उघड

गोव्याची धुरा पक्षाच्या आक्रमक खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांनीच नुकतीच गृहलक्ष्मी योजनेची घोषणा केली आहे. सध्या भाजप सरकारकडून महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. परंतु, त्यासाठी कमाल उत्पन्नाची मर्यादा आहे. तृणमूलची सत्ता आल्यानंतर ही रक्कम 5 हजार रुपये करून उत्पन्नाची मर्यादा काढून टाकण्यात येईल, असेही जाहीर करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com