किरीट सोमय्या हल्ल्याप्रकरणी गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

सोमय्या यांच्या हाताला गंभीर जखम झाली असून ते सध्या पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचार घेत आहेत.
Kirit Somaiya-Dilip walse Patil
Kirit Somaiya-Dilip walse PatilSarkarnama

शिक्रापूर (जि. पुणे) : भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शनिवारी (ता. ५ फेब्रुवारी) झालेल्या हल्ल्यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip walse Patil) यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. गृहविभाग या हल्ल्याची तत्काळ चौकशी करून जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही वळसे पाटील यांनी शिरूर तालुक्यातील केंदूर येथे बोलताना सांगितले. (Home Minister orders probe into Kirit Somaiya attack)

भाजप नेते किरीट सोमय्या हे कोविड सेंटरमधील भ्रष्टाचारी तक्रार देण्यासाठी आज पुण्यात आले हेाते. त्यावेळी त्यांनी पुणे महापालिकेला भेट दिली हेाती. त्या ठिकाणी शिवसैनिक आणि किरीट सोमय्या यांच्यामध्ये झटापट झाली होती. त्यात सोमय्या हे पाऱ्यावरून घसरून पडले होते. त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली असून ते सध्या पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Kirit Somaiya-Dilip walse Patil
डिसले गुरुजींच्या विरोधात ZP सदस्य आक्रमक : परितेवाडीसंदर्भात चुकीची माहिती दिली!

सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री वळसे पाटील यांनी ‘सरकारनामा’शी बोलत होते. ते म्हणाले की, गृह विभागाला प्राप्त झालेली माहिती अशी आहे की, ज्या ठिकाणी किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की झाली, तिथे त्याचवेळी दुसऱ्या एका पक्षाचा कार्यक्रम सुरू होता. तिथे नेमके भाजप कार्यकर्ते गेले आणि एकमेकांची बाचाबाची होऊन धक्काबुक्कीचा प्रकार घडला. या बाबत आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल.

Kirit Somaiya-Dilip walse Patil
दूध पंढरीचा आखाडा : आमदार संजय शिंदेंच्या फार्महाऊसवरील बैठकीला परिचारकांची हजेरी

दरम्यान, भाजपकडून या हल्ल्याविरोधात ठिय्या आंदोलने सुरू केल्याच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर आंदोलन करण्याचा प्रश्न का येतो, असे म्हणत त्यांनी भाजपच्या आंदोलनाच्या भूमिकेकडे दुर्लक्ष केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com