उपळाई बुद्रूक, (ता.माढा, सोलापुर) लोकसभेला आमच्या सोबत असणारे व सद्या बंडखोरी म्हणुन उमेदवारी दाखल करणाऱ्या प्रत्येकाशी चर्चा करून पुन्हा सर्व एकत्रित करून एकास एक लढतीसाठी प्रयत्न करणार आहे.
उत्तम जानकरांना येत्या दोन दिवसात राष्ट्रवादीपासुन दुर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य माढा लोकसेभेचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले.
माढा विधानसभेचे महायुतीचे उमेदवार संजय कोकाटे यांची उमेदवारी दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करायला खासदार निबांळकर माढा येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
खासदार निबांळकर पुढे म्हणाले की, उत्तम जानकरांची समजुत काढायला अजुन दोन दिवस बाकी आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभे राहु नये असा माझा सल्ला त्यांना असेल. त्यांची भेट घेऊन त्यांना राष्ट्रवादीपासुन दुर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच करमाळ्यात आमची भूमिका वेगळी असायला हवी होती.
परंतु त्या विषयावर सध्या टिप्पणी करणार नाही. वरीष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. पक्षीय स्तरावर झालेल्या निर्णयानुसार काम करू. तसेच माढा विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या नेत्यांशी चर्चा करून एकत्रित आणुन एकास-एक लढत देण्याचा प्रयत्न करणार आहे.
भाजप व शिवसेना या एकाच नाण्यांच्या एकच बाजु असल्याने भाजपचे तालुकाध्याक्ष संजय कोकाटे यांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, शिवसेना नेते प्रा शिवाजी सावंत, महायुतीचे उमेदवार संजय कोकाटे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.