कोरोनाची लस घेताय? 'आयसीएमआर' म्हणतेय...

देशात कोरोनाची लाट आली असून, सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवला आहे.
icmr says covid 19 vaccine reduces chances of infection and mortality
icmr says covid 19 vaccine reduces chances of infection and mortality
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशात कोरोनाची लाट आली असून, सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवला आहे. लस घेतल्यानंतर कोरोना संसर्गाचा धोका कमी होतो आणि संसर्ग झाल्यासही रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता 85 टक्क्याने कमी होत असल्याचे समोर आले आहे. याचबरोबर मृत्यूदरही कमी होत आहे, असे निरीक्षण भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिली आहे. 

कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही अनेक जण पॉझिटिव्ह सापडत आहे. याबद्दल बोलताना 'आयसीएमआर'चे महासंचालक बलराम भार्गव यांनी म्हटले आहे की, सध्या देशात देण्यात असलेल्या कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर संसर्गाची शक्यता कमी होत आहे. हे दोन्ही डोस घेतल्यानंतर तुमच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात आणि संसर्गाची शक्यताही अतिशय कमी होते. जास्त तीव्रतेचा संसर्ग आणि मृत्यू होण्याचे प्रमाण लस घेतल्यानंतर कमी होते. याचबरोबर लस घेतल्यानंतर संसर्ग झाला तरी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण 85 टक्क्याने कमी होत आहे. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com