Radhakrishna Vikhe : 'मविआ' आणि भाजपमधील नाराजांमुळे मंत्री विखेंना यंदा शिर्डी कठीण?

Minister Radhakrishna Vikhe unites against MVA and Vikhe in Shirdi Assembly Constituency? राज्याचे नेतृत्व करत असताना भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या शिर्डी मतदारसंघात यंदांची विधानसभा निवडणूक चुरशीची होणार असेच चित्र निर्माण झाले आहे. महाविकास आघाडी आणि विखे नाराज एकत्र येताना दिसत आहेत.
Radhakrishna Vikhe
Radhakrishna VikheSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Politics News : भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय विखे यांना रोखण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांना यश आले. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा एकीचा प्रयोग यशस्वी ठरला. आता हीच मोट मंत्री विखेंविरोधात शिर्डी विधानसभा मतदारसंघात बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडीचे नगर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडेच पारंपारिक पद्धतीने विखे विरोधकाचं नेतृत्व करताना दिसतील.

काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये स्थिरावलेले राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) हे मंत्रिमंडळात महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पद संभाळताना नगर आणि अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा कारभार संभाळत आहेत. कोणत्याही पक्षात असले, तरी 'विखे हाच पक्ष', अशी ओळख विखेंनी भाजपमध्ये देखील ठेवली आहे. राज्यापासून ते दिल्लीपर्यंत भाजपमधील बड्या नेत्यांशी थेट कनेक्शन मंत्री विखे ठेवून आहेत. त्यामुळे राज्यातील भाजप नेतृत्व काहीसे त्यांच्यावर नाराज आहेत. याशिवाय स्थानिक पातळीवर देखील त्यांच्याविरोधातील नाराजांची मोठी फौज नेहमीच तयार असते. मात्र अशा राजकीय पेचप्रसंगात देखील विखे 'लिलया' विरोधकांवर मात करत आले आहेत.

Radhakrishna Vikhe
Radhakrishna Vikhe : मंत्री विखेंचे 'मिसळ पाॅलिटिक्स'; थोरातांना घेरण्याच्या तयारीत...

भाजपमधून राज्यपातळीवर नेतृत्व करण्याची मंत्री राधाकृष्ण विखे यांची इच्छा आता लपून राहिलेली नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघ, बालेकिल्ला संभाळण्याची जबाबदारी पत्नी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे आणि पुत्र माजी खासदार सुजय विखेंवर सोपवून राज्यातील राजकारणात सक्रिय झालेत. तसे पहिल्यास मंत्री विखे गेल्या सहा विधानसभा निवडणुकीत शिर्डीवर वर्चस्व राखून आहेत.

परंतु राज्यातील राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर, शिवसेना आणि राष्ट्रवादी (NCP) पक्ष फुटल्यानंतर युती आणि आघाड्यांचे राजकारण सुरू झाले. यातून स्थानिक पातळीवर मंत्री विखेंविरोधात अधिक आक्रमक झालेत. लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणमधून मंत्री विखे आणि त्यांचे पुत्र सुजय विखेंविरोधात महाविकास आघाडीने दाखवलेला एकसंघ आणि विखे विरोधकांची बांधलेली मोट यशस्वी झाली. सुजय विखे यांचा खासदारकीच्या निवडणुकीत पराभव झाला.

Radhakrishna Vikhe
Ram Shinde And Nilesh Ghaiwal : भाजपचा उच्चशिक्षित आमदार आणि कुख्यात गुंड घायवळ एकत्र; विधानसभेच्या तोंडावर राम शिंदेंची 'ही' कृती चर्चेत

थोरातांनी विखेविरोधात उमेदवार हेरलाय!

नगर जिल्ह्यातील विखे विरोधक नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात एकप्रकारे एकटवला होता. नगर जिल्ह्यात महायुतीकडून मंत्री विखे आणि महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात नेतृत्व करत होते. पारंपारिक विरोधाक आमने-सामने होते. बाळासाहेब थोरात यांना विखे विरोधक, भाजपमधील विखे नाराजांची कमालीची मोट बांधली होती. आता हाच प्रयोग विधानसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघात होणार, अशी चर्चा खुल्यापणाने होऊ लागली आहे. तशी त्याची बीजं बाळासाहेब थोरातांनी लोकसभा निवडणुकीत पेरून ठेवलीत. शिर्डीत उमेदवार देखील ठरल्याची घोषणा बाळासाहेब थोरातांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारात सभेत करायचे, त्यामुळे मंत्री विखे यांना शिर्डी विधानसभा मतदारसंघात यावेळी बरीच ताकद खर्ची करावी लागणार, असे दिसते.

पिपाडांनी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी लावली ताकद

मंत्री विखे यांना शिर्डी विधानसभा मतदारसंघात स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडून विरोध सुरू झाला आहे. राजेंद्र पिपाडा यांनी उमेदवारीवर दावा ठोकला आहे. पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी तिकीट मागितले आहे. मंत्री विखे यांच्याविरोधात मतदारसंघात वातावरण आहे. ते यंदा निवडून येणार नाहीत, त्यामुळे भाजपची हातची जागा जाईल, असे सांगून त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागितली आहे. पिपाडा यांनी २००९ मध्ये शिवसेनेतून विखे यांना टक्कर दिली होती. त्यावेळी विखे काँग्रेसमध्ये होते. त्यावेळची आणि आताची राजकीय परिस्थिती खूप अंतर पडले आहे. त्यामुळे शिर्डीत यंदाची निवडून टशन देणारीच होईल, असे दिसते.

शिर्डी मतदारसंघाच्या चहूबाजूने प्रस्थापित

शिर्डी विधानसभा मतदारसंघाची रचना पहिल्यास संगमनेर, राहाता, श्रीरामपूर आणि कोपरगाव तालुक्यातील गाव मिळून तयार झालेला आहे. या तालुक्यांमध्ये राजकीय वर्चस्वाची वेगवेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे शिर्डीत यंदा काय, राजकीय गणितं जुळतील, याचा नेम नाही, असे सांगितले जात आहे. कोपरगावमधील माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि मंत्री विखे यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे.

स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनी गणेश सहकारी साखर कारखान्यात बाळासाहेब थोरात यांच्याशी युती करत विखेंना शह दिला. त्यापाठोपाठ साईबाबा संस्थानच्या कर्मचारी सोसायटी निडवणुकीत देखील विखे यांचे 25 वर्षांपासून वर्चस्व संपुष्टात आणले. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये देखील विखेंच्या पारंपारिक वर्चस्व असलेल्या ग्रामपंचायतींना सुरूंग लावला. विवेक कोल्हे यांचा नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीतील वावर लपून राहिलेला नाही. त्यामुळे शिर्डीची विधानसभा निवडणूक यावेळी वेगळाच रंग उधळते की का, याची उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com