
राजीनाम्याच्या कारणांवर चर्चा: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या प्रकृतीपासून राजकीय दबावापर्यंत अनेक कारणांची चर्चा सुरू आहे.
महाभियोग प्रस्ताव निर्णायक ठरला: विरोधकांनी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरोधात दिलेला महाभियोग प्रस्ताव स्वीकारल्याने सत्ता वर्तुळात खळबळ उडाली आणि त्यानंतरच धनखड यांनी तातडीने राजीनामा दिला.
भाजप वर्तुळात गोंधळ: भाजपमध्ये या निर्णयाने अंतर्गत हालचाली सुरू झाल्या असून खासदारांची गुप्त बैठक, सह्या आणि दिल्ली न सोडण्याचे आदेश यामुळे गूढराजकारणाचा संशय बळावला आहे.
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा देऊन आता दोन दिवस झाले आहेत. त्यांनी राजीनामा का दिला, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. यासाठी विविध कारणे सांगितली जात आहेत. जगदीप धनखड यांची त्यांच्या प्रकृतीमुळे राजीनामा दिला असला तरी त्यांची प्रकृती कशी आहे? याबाबत चर्चा न होता, त्यांनी राजीनामा का दिला? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता? असे अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत.
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोग चालवावा, असा प्रस्ताव विरोधकांनी राज्यसभेत दिला . त्यानंतर राजकीय चक्रे फिरली अन् अचानक उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले. त्यांनी राज्यसभेत यशवंत वर्मा यांच्याविरोधात विरोधकांनी दाखल केलेली महाभियोगाची नोटीस स्वीकारणे हा त्यांच्या राजीनाम्यामागील अनेक कारणांचा टर्निंग पॉईंट मानला जात आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 21 जुलै रोजी दुपारी दोन वाजता राज्यपाल धनखड यांनी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्ताव स्वीकारला तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या सर्वच खासदारांना आश्चर्याचा धक्का बसला. महाभियोगाच्या प्रस्तावावर 60 हून अधिक खासदारांच्या स्वाक्षऱ्या होत्या. मोदी सरकारला याची कल्पना नव्हती. प्रस्तावावर सत्ताधारी पक्षाच्या एकही खासदारांची सही नव्हती. त्यामुळे मोदी सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. 22 जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता राज्यभेच्या सभापतींनी कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलावली होती.
कामात व्यग्र असल्याने या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही, असे कारण देत केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि किरेन रिजिजू यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. त्यानंतर सांयकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद मोदी यांची भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांनी चर्चा केली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या दालनात मंत्री पोहचले. त्यानंतर राज्यसभेच्या सर्व खासदारांना बोलवण्यात आले.
दहा-दहा च्या गटाने खासदार राजनाथ सिंह यांच्या दालनात आले. त्याठिकाणी एका प्रस्तावावर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. घटकपक्षाच्या खासदारांना बोलवून त्यांच्याही सह्या घेण्यात आल्या. आगामी काही दिवसात दिल्ली न सोडून जाण्याचे व पत्रकारांशी संवाद न साधण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान या 3 तासातील राजकीय घडामोडींनंतर जगदीप धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिला.
जगदीप धनखड यांनी राजीनामा का दिला, यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
जगदीप धनखड यांनी दबावाखाली राजीनामा दिला की त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळाली?
जगदीप धनखड़ यांचा राजीनामा घेण्यात आला की त्यांनी राजीनामा दिला?
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या महाभियोग प्रस्तावात विरोधकांनी त्यांना चक्रव्यूहात अडकवले का?
त्यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांच्या भेटीबद्दल तक्रार केली होती का?
खुल्या व्यासपीठावर शेतकरी आंदोलनावर कृषीमंत्र्यांच्या प्रश्नावर विधान करणे काय केले बंद?
जास्त बोलण्याच्या नादात जगदीप धनखड अडकले आहेत का?
सभागृहात विरोधकांच्या अवाजवी स्वातंत्र्यामुळे समतोल बिघडला का?
जगदीप धनखड़ यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावाबाबतचे सत्य काय?
धनखड यांचा राजीनामा हा मोदी सरकारच्या अंतर्गत राजकीय समीकरण सुधारण्याचा परिणाम आहे का?
बिहार निवडणुकीचा प्रभाव त्यांच्या राजीनाम्यावर पडला का?
2029 मध्ये सत्ता काबिज करण्यासाठी भाजपचा हा राजकीय डाव आहे का?
भाजपच्या फेरबदलाची पहिली पायरी म्हणून धनखड यांना पदावरुन हटविण्यात आले का?
जगदीप धनखड़ यांच्या वक्तव्यावर न्यायपालिका नाराज असल्याचा हा परिणाम आहे का?
न्यायव्यवस्था जगदीप धनखड यांच्यावर नाराज झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला का?
4 FAQs (एक ओळीत उत्तरासह):
जगदीप धनखड यांनी राजीनामा का दिला?
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव स्वीकारल्यानंतर त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला.
राजीनाम्यामागे कोणता दबाव होता का?
भाजप नेतृत्वाच्या अस्वस्थतेमुळे व संभाव्य राजकीय दबावामुळे राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.
मोदी सरकारला महाभियोग प्रस्तावाबाबत माहिती होती का?
नाही, प्रस्तावावर कोणत्याही सत्ताधारी खासदारांच्या सह्या नव्हत्या.
धनखड यांचा राजीनामा भाजपमधील फेरबदलाचा भाग आहे का?
काही राजकीय विश्लेषकांच्या मते, हा राजीनामा भाजपच्या आगामी फेरबदलाची सुरुवात असू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.