गटातटाचे राजकारण रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेसच्या मुळावर

जिल्ह्यात कॉंग्रेसची मोठी ताकद होती. 1989 ला कॉंग्रेसचे शिवराम राजेभोसले खासदार होते. 1991 ला सुधीर सावंत, मच्छींद्र कांबळे, 2004 पुन्हा सुधीर सावंत आणि 2009 नीलेश राणे खासदार झाले. जिल्हात कॉंग्रेसचा आमदारही होता. मात्र कॉंग्रेसला ही ताकद वाढवायची सोडा टिकवूनही ठेवता आली नाही.
Infighting making Problems before Ratnagiti Congress
Infighting making Problems before Ratnagiti Congress

रत्नागिरी : दीडशे वर्षांची मोठी परंपरा असलेल्या कॉंग्रेसला जिल्ह्यात गेल्या पाच ते सात वर्षांतील गटातटाच्या राजकारणाने संपवित आणल्याची स्थिती आहे. कार्यकर्ते कमी आणि नेतेच अधिक झाल्याने पक्ष वाढलाच नाही. पक्ष बांधणी ऐवजी एकमेकाचे पाय ओढण्यातच वर्षे गेली. जिल्हाध्यक्षपदाला तर काही महत्त्वच राहिलेले नाही. चार वर्षे जिल्हाध्यक्ष मिळाला नाही, आता चार, सहा महिन्याला नियुक्त होत आहेत. पक्षापेक्षा प्रत्येकजण स्वतःला मोठे समजू लागल्याने कॉंग्रेसची जिल्ह्यात वाताहात सुरू आहे.

जिल्ह्यात कॉंग्रेसची मोठी ताकद होती. 1989 ला कॉंग्रेसचे शिवराम राजेभोसले खासदार होते. 1991 ला सुधीर सावंत, मच्छींद्र कांबळे, 2004 पुन्हा सुधीर सावंत आणि 2009 नीलेश राणे खासदार झाले. जिल्हात कॉंग्रेसचा आमदारही होता. मात्र कॉंग्रेसला ही ताकद वाढवायची सोडा टिकवूनही ठेवता आली नाही. यापूर्वी नारायण राणे कॉंग्रेसमध्ये आल्यामुळे निष्ठावंतांनी काम करणे सोडून देत तटस्थ राहणे पसंत केले. त्यामुळे पक्ष वाढीला खिळ बसली. त्यापूर्वी जिल्हाध्यक्ष रमेश कीर आणि सुजीत झिमण यांच्यातील गटतट चव्हाट्यावर आलेच होते.रमेश कीर यांनी राजीनामा दिल्यानतंर गेली चार वर्षे कॉंग्रेसला जिल्हाध्यक्ष मिळाला नाही. या कालावधीत पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षापासून दुरावू लागले.

पक्षश्रेष्ठींनी देखील पदाधिकाऱ्यांना झुंजवत ठेवल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येही कॉंग्रेसला कुठे स्थान नाही. यापासून धडा न घेता कुरघोड्या सुरूच राहिल्या. चार वर्षानंतर कॉंग्रेसने चिपळूणचे रमेश कदम यांना जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त केले. कदम पक्षबांधणीसाठी बाहेरच पडले नाही. कार्यकर्त्यांची नाराजी ओढून घेतली. त्यानंतर कार्यकारिणीवरून झालेला वाद विकोपाला गेल्याने त्यांनी राजीनामा दिला. पक्षाने जिल्हाध्यक्षपदाची धुरा ऍड. विजय भोसले यांच्याकडे दिली. भोसले पक्ष वाढीच्या दृष्टीने काहीतरी करतील, निर्णय घेतली अशी सर्वांची अपेक्षा होती. परंतु त्यांनी तालुका आणि शहर कार्यकारिणी बरखास्त केल्याचे घोषित करून गटातटाच्या वादाला हवा दिली.

आम्ही कॉंग्रेस निष्ठावंत आहोत. कॉंग्रेस वाढावा, मजबूत व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र गटातटाचे राजकारण आजही सुरू असल्याने पक्ष रसातळाला चालला आहे - प्रसाद उपळेकर, कॉंग्रेस रत्नागिरी तालुकाध्यक्ष

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com