जयंत पाटलांनी रोहित पाटलांसाठी सभाही घेतली नव्हती..

सांगली (Sangli) जिल्ह्यात नगरपंचायत (Nagar Panchayat Election) निवडणुकीच्या निमित्ताने नव्या पिढीचा उदय
Jayant Patil- Rohit Patil
Jayant Patil- Rohit Patilsarkarnama

सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यासाठी बुधवारचा दिवस महत्वाचा ठरला. संपूर्ण राज्यातील निकालात सर्व माध्यमांचा फोकस होता तो रोहित आर. आर. पाटील (Rohit Patil) यांच्यावर ! कवठेमंकाळ नगरपंचायत राज्यात गाजली.

आर. आर. पाटील (R. R. Patil) यांच्या निधनानंतर तासगाव आणि कवठेमंकाळ या शहरांतील त्यांच्या गटाचा प्रभाव कमी झाला असावा, असा अंदाज करून विरोधकांनी त्यांच्या विरोधात चक्रव्यूह रचला होता. त्यांनी एकाकी पाडले होते. पण, नुकताच सज्ञान झालेल्या 23 वर्षाच्या रोहित यांना हलक्यात घेणे खासदार संजय पाटील, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे आणि ज्यांची पूर्वापार सत्ता चालत आली आहे अशा सगरे गटाला चांगलेच महागात पडले. एखाद्या उदयन्मुख नेतृत्वाला हलक्यात घेणं महागात कसे पडू शकते, याचे हे आदर्श उदाहरण ठरावे. आर.आर. पाटील यांच्याकडून अनेकदा पराभूत झालेल्या खासदार पाटील आणि घोरपडे यांना हा पराभव जिव्हारी लागणारा आणि आयुष्यभर लक्षात राहील, असाच आहे.

Jayant Patil- Rohit Patil
रोहित पाटील यांचे कवठेमंकाळ मध्ये जल्लोषात स्वागत; पाहा व्हिडिओ

कवठेमहांकाळमध्ये आर. आर. यांच्या गटाला डावलून बाकी सगळे एकत्र आले तर सहज जिंकू, अशी मांडणी केली गेली. ती यशस्वी झाली असती, मात्र रोहित एकाकी पडल्याचा संदेश जोरात गेला. त्यांनी पक्षाला महत्व दिले आणि राष्ट्रवादीचे पॅनेल मैदानात उतरवले. या अनपेक्षित निर्णयाने जयंत पाटील देखील बुचकळ्यात पडले. एकीकडे रोहित आणि दुसरीकडे लोकनेते राजारामबापूंचा गट असलेले सगरे. या युद्धापासून जयंतराव दूरच राहिले. येथे त्यांनी एकही सभा घेतली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र रोहित एकटे पडणार नाहीत, आम्ही त्यांना ताकद देऊ, असे जाहीर सांगून बळ दिले होते.

Jayant Patil- Rohit Patil
रोहित पवार, सुनील शेळके आणि रोहित पाटील यांची कामगिरी जोरदार : नवाब मलिक,पाहा व्हिडिओ

त्यात रोहित यांच्या भाषणातील धार वातावरण तयार करायला उपयुक्त ठरले. आर. आर. यांच्याइतकेच वक्तृत्व लाभलेल्या रोहितने ‘मी पंचवीस वर्षाचा होईतोपर्यंत विरोधकांकडे काहीच शिल्लक ठेवत नाही’, अशी आर. आर. स्टाईल तोफ डागली. हे भाषण खूप गाजले. जी अपेक्षित हवा निवडणुकीला आवश्यक असते ती हवा या एका वाक्याने केली. रोहित यांना मिडियाने आणि पाठोपाठ मतदारांनी डोक्यावर घेतले. कसून टीमवर्क झाले. कोणीही दिग्गज प्रचारात नसताना तरुण कार्यकर्त्यांनी मिळवून दिलेला हा विजय राष्ट्रवादीसाठी जिल्ह्यामध्ये नवं नेतृत्व निर्माण करणारा ठरेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com