जुन्नर सभापती निवडीत शिवाजीराव आढळराव व अतुल बेनके यांची प्रतिष्ठा पणाला

शिवसेनेच्या पात्र सभासदांनी विधानसभेला पक्ष विरोधी भूमिका घेतली होती व बंडखोर अपक्ष उमेदवार आशा बुचके याचा प्रचार केला होता.
adhalrao-Benke
adhalrao-Benke

ओतूर : जुन्नर विधानसभेला पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केलेल्या सदस्यांना शिवसेना सत्तेपासून दूर ठेवणार की,सत्तेसाठी सामावून घेणार याची ज्येष्ठ कार्यकर्त्यांत जोरदार चर्चा आहे.


राज्यातील महाआघाडी प्रमाणे जुन्नर पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीत सत्तेच्या चाव्या कॉंग्रेस पक्षाकडे आहे.राज्य सरकारच्या धर्तीवर तालुक्यात महा आघाडी होणार की नाही हे शेवटच्या दिवशी स्पष्ट होईल.


शिवसेना  व राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षाकडुन जुन्नर पंचायत समिती सभापती पदासाठी मोर्चे बांधणीला जोरदार सुरुवात झाली असून सभापती पद आपल्याच पक्षाला मिळावे यासाठी पक्ष नेतृत्वाचे प्रयत्न सुरु झाले आहेत. दोन्ही पक्षानी आपआपल्या सदस्याना एकत्र ठेवण्यासाठी सहलीला नेले असल्याचे समजते.


सभापती निवडीसाठी उपनेते खासदार शिवाजीराव आढळराव व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अतुल बेनके यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सभापती पद नागरिकांच्या इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असून शिवसेनेकडे जीवन शिंदे, अर्चना माळवदकर हे उमेदवार आहे तसेच दिलीप गांजळे हेही पात्र असल्याचे समजते . त्यामूळे हे शिवसेनेकडे सभापती पदासाठी हे तीन उमेदवार आहे. 


तर राष्ट्रवादी कडे नंदा बनकर व विशाल तांबे दोन सभापती पदास पात्र उमेदवार आहे. परंतु शिवसेनेच्या पात्र सभासदांनी विधानसभेला पक्ष विरोधी भूमिका घेतली होती व बंडखोर अपक्ष उमेदवार आशा बुचके याचा प्रचार केला होता. यामुळे यातील इच्छुक उमेदवारास संधी देण्याबाबत जेष्ठ शिवसैनिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. 


शिवसेनेच्या सभापती पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारानी विधानसभा निवडणूकीत पक्ष विरोधी काम केले असल्याने शिवसेनेतील एक गट या बंडखोराना सत्ते पासून दुर ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते. जुन्नर पंचायत समितीत शिवसेनेचे सात सदस्य असून पैकी चार सदस्यानी बडखोर उमेदवारस साथ दिली होती. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहा सदस्य असून पैकी दोन या आरक्षणास पात्र आहेत.


जुन्नर तालुक्याचे खासदार व आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे असल्यामुळे पंचायत समितीचे सत्ताकेंद्र देखील पक्षाकडे असावे अशी कार्यकर्त्याची भावना आहे. त्यासाठी कॉंग्रेसचा एक सदस्य व शिवसेनेचा कमीत कमी एक सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराचे मागे उभे राहणे गरजेचे आहे. यादृष्टीने देखील तयारी असल्याचे सांगण्यात येते. असे झाले तरच राष्ट्रवादी कॉंग्रेसला सभापती पद मिळन्याची शक्यता आहे.


जुन्नर पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक 31 डिंसेबरला होणार जुन्नर पंचायत समितीची सभासद संख्या 14 असून सभापती पदासाठी आठ सदस्याचा जादूई आकडा गाठणे  गरजेचे आहे.

या आधी सत्तेत असलेले शिवसेना व कॉंग्रेस पून्हा एकत्र येवून सत्ता स्थापन करतात की राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेनेचा एकादा सदस्य बंडखोरी करुन राष्ट्रवादीशी हातमिळवणी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.  

सात सात सदस्य होऊन चिठ्ठीने सभापती ठरतो, नाही तर राज्य सरकार प्रमाणे शिवसेना,राष्ट्रवादी व कॉंग्रेस सर्व मिळून सत्तेत सहभागी होतात हे चित्र निवडणूकी नंतरच स्पष्ट होणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com