Kerala Lok Sabha 2024: डावे डोके वर काढू देईना, 'कमळ' फुलेना, 'हात' हलेना!

Lok Sabha Election 2024: काँग्रेसच्या UDF नं मात्र 2019 च्या निवडणुकीत 20 पैकी 19 जागा जिंकून डाव्यांनाही (LDF) चकवा दिला होता. डाव्यांना अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं.
Kerala Lok Sabha 2024
Kerala Lok Sabha 2024Sarkarnama

Loksabha Election 2024 : 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी मित्रपक्षांच्या मदतीनं दक्षिण दरवाजा उघडण्याचा पुन्हा एकदा घाट घातलाय. दक्षिणेकडील सर्व राज्यांतील मतदानाचे टप्पे पूर्ण झाले आहेत. आता निकाल येणं तेवढं बाकी आहे. 'दक्षिणेचं द्वार कुणासाठी खुलं होणार?' या मालिकेच्या चौथ्या भागात पाहूयात केरळात (Kerala Lok Sabha Election 2024) काय होणार?

मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांचा निकाल पाहाता भाजपसह तिच्या NDA मधील घटक पक्षांना केरळचं 'इडली सांबार' काही पचलेलं दिसत नाही. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांत NDA चा स्कोअर 0/20 असा राहिलाय. काँग्रेसच्या UDF नं मात्र 2019 च्या निवडणुकीत 20 पैकी 19 जागा जिंकून डाव्यांनाही (LDF) चकवा दिला होता. डाव्यांना अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं.

2014 व 2019 च्या लोकसभेत भाजपच्या हाती भोपळाच!

केरळात लोकसभेच्या एकूण 20 जागा आहेत. NDA नं 2014 मध्ये सर्वच्या सर्व जागा लढवल्या होत्या. त्यापैकी एकट्या भाजपनं 18 जागा लढवल्या आणि आपले मित्र पक्ष KCN आणि RSP यांना प्रत्येकी एक जागा दिली होती मात्र NDA च्या खात्यात एकही जागा जमा झाली नाही. 2019 मध्ये देखील NDA पुन्हा एकदा सर्व जागा लढवण्यासाठी मैदानात उतरला. भाजपनं (BJP) त्यापैकी 15 तर भारत धर्म जन सेना (BDJS) पक्षानं 04 आणि KCT नं 01 जागा लढवली होती मात्र पुन्हा एकदा NDA च्या हाती आला भला मोठा शून्य! 2024 च्या लोकसभेसाठी भाजप आणि त्याचा मित्र पक्ष BDJS हातात हात घालून मैदानात उतरले. भाजपनं 16 तर BDJS नं 04 जागांवर निवडणूक लढवलीये.

काँग्रेसचा वाढतोय जोर, डाव्यांना लागलाय घोर!

UDA नं देखील 2014 मध्ये सर्वच्या सर्व जागा लढवल्या आणि 12 जागा जिंकल्या. काँग्रेसनं लढवलेल्या 15 जागांपैकी 08 जागा जिंकल्या तर IUML नं 02, KC (M) नं 01 आणि RSP नं 01 जागा जिंकली. SJ (D) ला मात्र खातं खोलता आलं नाही. 2019 मध्ये देखील UDA पुन्हा एकदा सर्व जागा लढवल्या. काँग्रेसनं (Congress) 16 पैकी 15 जागांवर विजय मिळवला तर मित्र पक्ष IUML KC (M) आणि RSP नं मागच्या वेळचे नंबर कायम ठेवले. 2024 च्या लोकसभेसाठी काँग्रेस देखील त्याचे मित्र पक्ष सोबत घेऊन रणांगणात उतरला. काँग्रेसनं 16 जागा लढल्या तर IUML नं 02 आणि KC तसेच RSP नं प्रत्येकी 01 जागा लढवली.

राज्यात डाव्यांची सत्ता पण लोकसभेचा सापडेना पत्ता!

2016 आणि 2021 या दोन्ही विधानसभा निवडणुकीत डाव्यांनी 'केरळ आमचंच' हे दोन्ही राष्ट्रीय पक्षांना दाखवून दिलं. CPI (M) चे पिनारायी विजयन गेली दोन टर्म केरळचे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळत आहेत मात्र लोकसभा निवडणुकांमध्ये डाव्यांना म्हणावं तसं यश मिळताना दिसत नाही. 2014 मध्ये LDF या डाव्या आघाडीनं सर्व जागा लढवल्या खऱ्या पण त्यांना केवळ 20 पैकी 08 जागा जिंकता आल्या. CPI (M) नं सर्वाधिक म्हणजे 05 जागा मिळवल्या. LDF च्या पाठिंब्यावर 05 अपक्षांनी निवडणूक लढवली. त्यातले 02 जण विजयी झाले. CPI ला 01 जागा जिंकता आली पण JD (S) ला खातंही खोलता आलं नाही.

Kerala Lok Sabha 2024
Girish Mahajan news: गिरीश महाजनांनी वाढवली भाजप आमदारांची धडधड!

2019 मध्ये LDF नं पुन्हा सर्व जागा लढवल्या पण यावेळी त्यांचा स्कोअर राहिला अवघा एक! CPI (M) नं लढवलेल्या 14 जागांपैकी केवळ एक जागा जिंकता आली तर मित्र पक्ष CPI आणि KEC यांना एकही जागा मिळाली नाही. सर्वाधिक म्हणजे 05 जागा मिळवल्या. LDF च्या पाठिंब्यावर लढलेला अपक्ष उमेदवारही फेल ठरला. 2024 मध्ये डावे पक्ष पुन्हा एकदा ताकदीनिशी मैदानात उतरले होते. CPI (M) नं 15, CPI नं 04 तर KC (M) नं एक जागा लढवलीये.

एकूणच काय तर केरळात डावे विरुद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होताना दिसत असली तरी भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांची स्थिती मात्र 'डावे डोके वर काढू देईना, 'कमळ' फुलेना, 'हात' हलेना', अशी झालीये. (मालिकेच्या शेवटच्या भागात... तेलंगणा)

Edited by: Mangesh Mahale

Kerala Lok Sabha 2024
Prashant kishor News : प्रशांत किशोर यांचा भाजपवर गंभीर आरोप, 'अवघ्या 30-35 जागांसाठी भविष्याशी खेळले'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com