" केसरकर सुरू तुम्ही केले, संपवणार आम्ही ' : नितेश राणे 

" केसरकर सुरू तुम्ही केले, संपवणार आम्ही ' : नितेश राणे 

मुंबई : राणे आणि केसरकर सिंधुदुर्गातील या दोन नेत्यांमधील वाद तसा नवा नाही. राज्याचे गृहराज्यमंत्री व सिंधुदुर्गाचे पालकमंत्री असलेल्या दीपक केसरकर यांनी काही दिवसंपूर्वीच नारायण राणे यांच्यावर टीका केली होती . यावर प्रत्युत्तर म्हणून आमदार नितेश राणे यांनी रणशिंग फुंकले असून केसरकर तुम्ही सुरवात केली आहे, मात्र संपविणर आम्ही असे " ट्विट ' केले आहे. 

केसरकरांनी महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळात उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या मदतीने त्यांच्या पदाचा गैरवापर करत अनेक पदे भरली आहेत. यासंबधी आमच्याकडे नुसती कागदपत्रे नसून त्याची 'सीडी'ही आहे. लघु उद्योगाप्रमाणे आणखी काही ठिकाणी केसरकरांनी केलेले गैरव्यवहाराचा पर्दापाश आगामी अधिवेशन काळात उघड करू, असेही नितेश राणे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

मांजर दूध पिताना डोळे बंद करून पिते म्हणून तिला वाटते की मला कोणीही पाहत नाही. त्यामुळे महाराष्ट्र लघु उद्योग मंडळात काय 'लफडी' चालू आहेत ती आगामी अधिवेशनात मांडू, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. 

केसरकर राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत आल्यानंतर गृहराज्यमंत्रिपदाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. एकाच जिल्ह्यात असल्याने राणे आणि केसरकर यांमध्ये खटके हे उडतच असतात. यापूर्वी केसरकरांनी राणे कुटुंबियांवर अनेकदा आरोप केलेले आहेत. गेल्याच आठवड्यात राणेंच्या इडी चौकशी बाबत देखील केसारकरांनी प्रश्न उपस्थित केले होते. राणेंनी स्वतःचा पक्ष स्थापन केल्यानंतर ते भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. म्हणूनच केसरकरांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे बोलले जाते. त्यामुळे राणे विरुद्ध केसरकर वाद आणखीनच चिघळण्याची शक्‍यता वर्तीविली जाते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com