किरीट सोमय्यांचे वजन भाजपमध्ये वाढले.. कारण की....

पश्चिम महाराष्ट्रातील सारख सम्राटांकडे वळाल्यानंतर सोमय्या (Kirit Somaiya) यांची ग्रामीण भागातही चर्चा
MP Kirit Somaiya speaking at the press conference
MP Kirit Somaiya speaking at the press conferencesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : सत्ताधारी पक्षाचे मंत्री,आमदार यांच्यासह त्यांचे निकटवर्तिय व्यावसायिक,पक्षातील पदाधिकारी,विश्वासू यांच्याशी संबधीत भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणून आरोपांचा हंगामा करणाऱ्या "सोमय्या अस्त्रा"ने सत्ताधार्यांना घायाळ करण्याची रणनीती अवलंबल्याचे चित्र आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 2014 मध्ये तत्कालीन आघाडी सरकारमधील मंत्री, नेते, आमदार यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणली होती. त्याचा भाजपला फायदा झाला आणी भाजपची राज्यात सत्ता आली. त्यानंतर सध्या ही किरीट सोमय्या यांनी राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री,लोकप्रतिनीधी,खासदार,आमदार यांच्याकडे मागील काही महिन्यांपासून मोर्चा वळवला आहे. त्यांनी अनेक प्रकरणे उघडकीस आणून महाविकास आघाडीला धारेवर धरले आहे.

MP Kirit Somaiya speaking at the press conference
'किरीट सोमय्यांना कोल्हापूरात येऊ द्या, त्यांना अडवू नका'

सोमय्या यांनी सध्या पश्चिम महाराष्ट्रातील सहकार खात्यातील विशेषतः साखर कारखान्याकडे आपला रोख वळवला आहे. राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबधीत साखर कारखान्याच्या कथित भ्रष्टाचाराचे प्रकरण नुकतेच चव्हाट्यावर आणल्यावर त्यांनी पारनेर येथील साखर कारखान्याची सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) सुरू केलेल्या चौकशीची माहिती दिली. तर त्यानंतर लगेच शिरूर येथील साखर कारखान्यातील कथीत भ्रष्टाचाराची कागदपत्रे लवकरच हाती लागणार आहेत, अशी माहिती सोमय्या यांनी दिली.


राज्यात आगामी काळात "मिनी विधानसभा" म्हणून गणल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी भ्रष्टाचाराची विवीध प्रकरणे उघडकिस आणून महाविकास आघाडीची प्रतिमा मलिन करण्याचा भाजपचा डाव असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यासाठी भाजपा "सोमय्या अस्त्रा"चा वापर करत आसल्याचे मानले जाते.

MP Kirit Somaiya speaking at the press conference
किरीट सोमय्या म्हणाले, ठाकरे सरकार हे डाकू आणि माफियांचे

भाजपमध्ये सोमय्याचे राजकीय वजन वाढले!
लोकसभा निवडणुकीत तिकीट कापल्याने अडगळीत पडलेले किरीट सोमय्या हे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत.त्यांनी एकामागून भ्रष्टाचाराची प्रकरणे काढल्यामुळे पक्षात सोमय्या यांचे वजन वाढले आसल्याचे भाजपात बोलले जात आहे. त्यांना केंद्र सरकारकडून मिळालेली झेड दर्जाची सुरक्षा राज्यातील फार कमी नेत्यांना आहे, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com