Lok Sabha Election 2024 : नंदुरबारमध्ये काँग्रेसला येणार गतवैभव? अशी झाली गावित विरुध्द पाडवी लढत...

Congress News : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडले. मतदानाच्या दोन-तीन दिवस आधी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा झाल्या होत्या.
Heena Gavit, Gowal Padvi
Heena Gavit, Gowal PadviSarkarnama

Nandurbar Constituency 2024 News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात नंदुरबारमधील लढत लक्षवेधी ठरली आहे. सुरूवातील विद्यमान खासदार आणि महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना विजयकुमार गावित यांच्यासाठी एकतर्फी वाटणारी लढत मतदानाच्या दिवसापर्यंत अत्यंत चुरशीची बनली.

भाजप विरूध्द काँग्रेस अशी थेट लढत पाहायला मिळाली. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबारमध्ये पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी काँग्रेसने जोरदार प्रचार केला. गावितांविरोधात नाराजी, मित्रपक्षांची फारकत, घराणेशाहीचा आरोप, नेत्यांची नाराजी अशा अनेक आघाड्यांवर महायुती लढत होती. त्यामुळे हिना गावित हॅट्ट्रिक करणार की काँग्रेस गड खेचून आणणार, हे येत्या चार जूनलाच स्पष्ट होईल.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघांसह महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात सोमवारी चौथ्या टप्यात मतदान झाले. नंदुरबार मतदारसंघात कितीही उमेदवार असले तरी आतापर्यंत खऱ्या अर्थाने भाजप-काँग्रेस यांच्यातच सरळ लढत होत आली आहे.

यंदाची निवडणूक अपवाद नसली तरी उमेदवार बदलले आहेत. यावेळी मागील दोन निवडणुकीत उमेदवार असलेले माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे पुत्र ॲड. गोवाल पाडवी (Gowal Padvi) यांचे आव्हान हिना गावित (Heena Gavit) यांच्यासमोर आहे. (Latest Political News)

Heena Gavit, Gowal Padvi
Lok Sabha Election 2024: कुणीही आले तर काय... या भावनेतून तर मतदानाचा टक्का घसरत नाही ना?

दोन्ही उमेदवार तरूण व उच्चशिक्षित आहेत. मात्र, गावित परिवारावर घराणेशाहीचा आरोप होत आहे. त्यातच या निवडणुकीतील मित्रपक्षांची नाराजीही प्रकर्षाने पुढे आली. महायुतीत असलेल्या शिवसेना (Shiv Sena) व राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या मित्र पक्षांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याने ते नाराज आहेत. निवडणुकीतही त्याचा पडसाद उमटले. प्रचारात मित्रपक्षांचे पदाधिकारी फारसे सक्रीय नव्हते, असे चित्र होते. त्याउलट मित्रपक्षाचे कार्यकर्ते विरोधकांच्या तंबूत दिसत होते. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गावितांविरोधातील याच नाराजीने काँग्रेसला मोठे बळ मिळत गेले. महाविकास आघाडीचा उमेदवार नवखा असला तरी महायुतीतील मित्रपक्षांची नाराजी, घराणेशाहीला विरोध असणारे व पक्षात राहून नेत्यांना विश्‍वासात न घेण्याचा आरोप करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमुळे काँग्रेसची ताकद वाढली. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या सभेने मतदारांना इंदिरा मायची आठवण करून दिली. सभेला जमलेली अफाट गर्दीही महायुतीसाठी धोक्याची घंटा होती. त्यातून मतदारांमध्ये काँग्रेसविषयी सहानुभूती निर्माण झाली.

काँग्रेसने प्रचारात मणिपूर घटना, आरक्षण, महागाई, बेरोजगारी हे मुद्दे प्रभावीपणे मांडले. तर गावित यांनी दहा वर्षात केलेली विकासकामे, मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना, कुपोषण, आरोग्य, शिक्षण, बेरोजगारांसाठी केलेले प्रयत्न, तसेच वडील मंत्री डॉ. विजयकुमार गावित व बहीण जि. प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी केलेली कामे जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूने जोरदार प्रचार करण्यात आला असून मतदारांमध्ये संमिश्र प्रतिसाद दिसून आला. आता मतदारांचा कौल कुणाला मिळणार, हे चार जूनला स्पष्ट होईल.

मतदानाची टक्केवारी

2019 – 68.33 टक्के

2024 – 70.66 टक्के

विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी

मतदारसंघ - 2019 - 2014

नंदुरबार – 73.52 – 60.03

साक्री – 65.31 – 62.08

शहादा – 70.21 – 65.46

अक्कलकुवा - 62.39 - 57.28

शिरपूर – 65.17 – 58.05

नवापूर – 75.28 – 72.60

(Edited By - Rajanand More)

Heena Gavit, Gowal Padvi
Lok Sabha Election 2024 : चौथ्या टप्प्यातील कमी टक्क्याने कोणाची दांडी होणार गुल ? राज्यातील दिग्गज नेत्यांची लागणार कसोटी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com