Lok Sabha Election News : चौथ्या टप्प्याच्या प्रचार तोफा थंडावल्या; दानवे, मुंडे, कोल्हे, खडसेंची प्रतिष्ठा पणाला

Political News : शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. चौथ्या टप्प्यात अनेक लढती या चुरशीच्या होणार आहेत.
Lok Sabha Election News
Lok Sabha Election NewsSarkarnama

Mumbai News : चौथ्या टप्प्यात राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघांत 13 मे रोजी मतदान होणार आहे. तर देशातल्या 10 राज्यातील 96 मतदारसंघात मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. या मतदारसंघांतील प्रचाराच्या तोफा शनिवारी सायंकाळी थंडावल्या. राज्यातील 11 मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पारंपरिक विरोधक पुन्हा समोरासमोर आल्याने या निवडणुकीत केंद्रीयमंत्री रावसाहबे दानवे, पंकजा मुंडे, अमोल कोल्हे, एकनाथ खडसेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

राज्यात 13 मे रोजी नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, मावळ, अहमदनगर, पुणे, शिरुर, शिर्डी, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघात मतदान होणार आहे. शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. चौथ्या टप्प्यात अनेक लढती या चुरशीच्या होणार आहेत. (Lok Sabha Election News)

Lok Sabha Election News
Shirur Lok Sabha: आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, आता कफन बांधलेला बंडखोर..., कोल्हेंचं थेट अजितदादांना आव्हान

निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आक्रमक झालेल्या नेतेमंडळीनी एकमेकांना चांगलेच लक्ष्य केले आहे. चौथ्या टप्प्यात पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit saha ), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरेंची सभा पार पडली. यासह काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, नाना पाटोले यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांनी सर्व भाग पिंजून काढला. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते.

पहिल्या तीन टप्प्यातील प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मार्च ते 5 मे या पहिल्या तीन टप्प्यांत 83 प्रचारसभा घेत पहिल्या क्रमांकावर आहेत. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 66 सभा दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या काळात पंतप्रधान मोदींनी 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 83 निवडणूक सभा आणि 'रोड शो'मध्ये भाग घेतला. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी 40 निवडणूक प्रचारसभांना संबोधित केले, तर प्रियांका गांधी यांनी 29 प्रचार सभांमधून जनतेला संबोधित केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी मुत्सद्देगिरीच्या जोरावर महायुतीला हतबल करण्यासाठी काही मतदारसंघांवर अधिकचे लक्ष केंद्रित केल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार काही ठिकाणी नसतानाही उद्धव ठाकरे यांनी सभा घेत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

चौथ्या टप्प्यात पीएम नरेंद्र मोदी यांच्या बीड, शिर्डी व याठिकाणी सभा घेतल्या तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जालना येथे सभा पार पडली. प्रियंका गांधी यांची नंदुरबारमध्ये तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या उद्धव ठाकरेंच्या सभेस विक्रमी गर्दी केली होती. तर दुसरीकडे पावसामुळे त्यांना जालना येथील सभा रद्द करावी लागली. चौथ्या टप्प्यात त्यांनी ठाणे, मावळ, छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेतल्या.

चौथ्या टप्प्यातील पीएम नरेंद्र मोदी व उद्धव ठाकरे यांच्या सभेला मोठी जमलेली गर्दी पाहता नक्की ही गर्दी कोण मतदानात रूपांतरित करू शकतो त्याचा विजय निश्चित होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारणार, हे समजण्यासाठी सर्वांना 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे.

Lok Sabha Election News
PM Narendra Modi News : मोदींकडून थेट शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना 'एनडीए'त येण्याची ऑफर

पुणे मतदारसंघात भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि कॉंग्रेसने रविंद्र धंगेकर यांच्या मुख्य लढत होत आहे. शिरुर मतदारसंघात शरद पवार यांच्या गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात अजित पवार गटात आलेले शिवाजीराव आढळराव पाटील गेल्या पराभवाचा वचपा काढणार का? याकडे लक्ष लागले आहे. मावळ मतदारसंघात महायुतीचे शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाचे संजोग वाघेरे अशी लढत होत आहे.

नगर मतदारसंघात भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रसचे नीलेश लंके अशी लढत होणार आहे. शिर्डी मतदार संघात शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात तर ठाकरे गटाने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेसच्या उत्कर्षा रुपवते या मैदानात उतरल्या आहेत.

Lok Sabha Election News
Pankaja Mundhe News : पंकजा मुंडेंसाठी जिल्ह्यासह बाहेरुनही बड्या नेत्यांची कुमक !

मराठवाड्यातील बीड मतदारसंघात भाजपने प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून यंदा पंकजा मुंडे यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांच्याशी लढत होत आहे. छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) हा मतदार संघामध्ये येथून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांची एआयएमआयएमचे इम्तियाज जलील, महायुतीचे संदीपान भुमरे यांच्यात लढत होत आहे. जालना मतदारसंघात भाजपचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा सामना कॉंग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांच्याशी होणार आहे.

रावेर मतदारसंघातून भाजपच्या खासदार रक्षा खडसे विरोधात शरद पवार गटाचे उद्योजक श्रीराम पाटील रिंगणात आहेत. तर जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ यांच्या विरोधात ठाकरे गटाचे करण पवार अशी लढत होत आहे.

Lok Sabha Election News
Beed Election News : अजितदादांच्या 'त्या' टीकेला दिले सोनवणेंनी उत्तर; म्हणाले, मावळमध्ये पार्थचा पराभव...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com