...तर उल्हास पवार मुख्यमंत्री असते !

कॉंग्रेस पक्षाचा सूक्ष्म अभ्यास असणारे उल्हास पवार हे काँग्रेसचे शब्दकोश आहेत. सत्तेपेक्षा त्यांनी पक्षबांधणीला अधिक महत्त्व दिले. त्यांच्याकडे कर्तृत्व व नेतृत्व हे दोन्ही गुण आहेत. असे असतानाही त्यांच्या कष्टाला फळ मिळालेले नाही. - सुशीलकुमार शिंदे
...तर उल्हास पवार मुख्यमंत्री असते !
Published on
Updated on

पुणे : "काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेली आणि पक्षबांधणीसाठी आयुष्य वेचणारी व्यक्ती म्हणून उल्हास पवार यांच्याकडे पाहिले जाते. काँग्रेस परिवारातील संजय गांधी यांच्या विश्‍वासातील राज्यातील एकमेव व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांनीच पवार यांना मुख्यमंत्री करण्याचीही तयारी केली होती. मात्र काही कारणामुळे ते शक्‍य झाले नाही," असा सुखद गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला.

उल्हास पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिवदर्शन येथील मुक्तांगण शाळेमध्ये 'गझलरंग' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी शिंदे यांच्या हस्ते पवार यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, कमल व्यवहारे, नरेंद्र व्यवहारे, अंकलकोट पाटील उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, "कॉंग्रेस पक्षाचा सूक्ष्म अभ्यास असणारे उल्हास पवार हे काँग्रेसचे शब्दकोश आहेत. सत्तेपेक्षा त्यांनी पक्षबांधणीला अधिक महत्त्व दिले. त्यांच्याकडे कर्तृत्व व नेतृत्व हे दोन्ही गुण आहेत. असे असतानाही त्यांच्या कष्टाला फळ मिळालेले नाही. राजकारणात खूप मोठे धाडस लागते, ते धाडस पवार यांच्याकडे आहे."

डॉ. सबनीस म्हणाले, "विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे व उल्हास पवार यांची निस्सीम मैत्री होती. त्यांच्या मैत्रीमध्ये कधीही कटुता निर्माण झाली नाही. पवार हे राजकारणातील भूषण आहेत. सध्याची काँग्रेस महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, यांचे विचार विसरत चालली आहे. त्याचीच फळे काँग्रेस सध्या भोगत आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com