नाशिक : राजकीय नेते, पक्षांच्या कार्यक्रमातील विनापरवाना वीज जोडण्या व चोरी नवे नाही. मात्र आज येथे झालेल्या उर्जामंत्री चंद्बारशेखर बावनकुळे यांच्या जनता दरबारासाठीच आकडा टाकुन वीज घेण्यात आल्याचे उघड झाले. याबाबत माध्यमांनी चित्रीकरण केल्यावर मात्र प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. त्यामुळे वीजचोरी विरोधात जनतेचे प्रबोधन करणा-या मंत्र्यांच्या खुर्चीखालीच अंधार अशी स्थिती झाली.
राज्य शासनातर्फे आज मंत्र्यांचा जनतेशी संवाद होता. त्याअंतर्गत येथील इच्छामणी लाॅन्समध्ये उर्जामंत्री जनतेशी संवाद साधणार होते. हा संवाद सुरु असतांना चित्रीकरण करीत असतांना व्यासपीठामागेच वीजेच्या खांबावरुन थेट आकडा टाकून वीज घेतली होती. त्याच्या वाहिन्याही उघड्याच असल्याने सगळेच असुरक्षीत होते. याचे चित्रीकरण केल्यावर वीज वितरणचे अभियंता कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांना विचारणा केली असता आम्ही पर्यायी व्यवस्था म्हणून जोडणी घेतली आहे. मीटर तसेच अन्य पूर्तता विसरुने गेलो. त्याचे काम करण्याच्या सूचना लगेचच देतो. असे सांगितले.
दुसरा अधिकारी मात्र मीटर बसवलेले नाही असे सांगत राहिला. एकंदर या विषयावरुन गोंधळ सुरु झाल्याने त्याची माहिती कळल्यावर अधिकारी घामाघुम झाले. मंत्री मात्र याविषयी अनभिज्ञ असल्याने माहिती घेऊन माहिती देतो असे म्हणाले. या साऱ्या प्रकारामुळु मूळ कार्यक्रमापेक्षा अनधिकृत जोडणीचीच चर्चा रंगली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.