विनाकारण आमची माथी भडकवू नका 

विनाकारण आमची माथी भडकवू नका 
Published on
Updated on

मुंबई : कोपर्डीतील आमच्या भगिनीवर बलात्कार झाल्यानंतर मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही कोपर्डीत आला होता. त्यावेळी द्रुतगती न्यायालयात हा खटला चालवून नराधमांना फाशी देण्याचे आश्‍वासन तुम्ही दिले होते त्याचे काय झाले साहेब ? आणखी कितीवर्षे न्यायाची प्रतीक्षा करायची असा सवाल मुंबईतील मराठा मोर्चासमोर बोलताना समाजातील मुलींनी केला. त्यावेळी लाखो मराठ्यांने डोळे क्षणभर पानावले आणि मनही सुन्न झाले. 

समाजाला आरक्षण देण्याबरोबरच कोपर्डीतील बलात्कारप्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी या मागणीसाठी आज मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात आला. भायखळ्याहून निघालेला मोर्चा आझादमैदानावर पोहचल्यानंतर काळा पोशाख परिधान केलेल्या मुलींची भाषण झाले. यावेळी या मुलींनी मोर्चेकरांसमोर मागण्यांचे निवेदन वाचून दाखविले. 

त्यानंतर एका मुलींनी समाजाच्या कथा आणि व्यथा मोर्चेकरांसमोर मांडल्या. कोपर्डी घटनेतील बलात्काऱ्यांना फाशी देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्रीसाहेबांनी दिले होते त्याचे काय झाले असा खडा सवालच यावेळी करण्यात आला. आरक्षणासह मराठा समाजाच्या ज्या काही मागण्यासाहेत त्या तातडीने मार्गी लावल्या पाहिजेत. विनाकारण आमची माथी भडकवू नका असा इशाराही यावेळी सरकारला देण्यात आला. जो शेतकरी हातात नांगर धरू शकतो तोच शेतकरी हातात तलवारही घेऊ शकतो हे लक्षात घ्या. यापुढे आम्ही अन्याय सहन करणार नाही. आमच्या समाजातील पोरीही म्हणतील तलवारी काढा. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com