Modi 3.0 Cabinet: मोदींचा ‘सेफ गेम’; मंत्रिमंडळामध्ये भाजपचं 'मोठा भाऊ'

3rd Term of Modi Government Modi 3.0 Cabinet Chandrababu Naidu, Nitish Kumar : चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार हे दोन्ही बडे नेते भाजपवर राजकीय दबाब टाकण्यास कमी पडले, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.
3rd Term of Modi Government
3rd Term of Modi GovernmentSarkarnama

PM Modi Cabinet 2024 : 'चारसो पार'चा नारा देणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीनंतर 240 जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपल्या गेल्या लोकसभा निवडणुकीत 303 जागा मिळाल्या होत्या.

नरेंद्र मोदींना स्वबळावर ३०० जागा मिळवल्या असत्या, तर मंत्रिमंडळात पूर्ण बदल झाला असता. कमी जागा मिळाल्याने भाजपमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे भाजपच्या जुन्या मंत्र्यांना न डावलता मोदींनी तिसऱ्या टर्ममध्ये‘सेफ गेम’खेळला आहे.

तिसऱ्या टर्ममध्ये नरेंद्र मोदी यांची राजकीय वजन घटले असले तरी मंत्रिपदे वाटताना मात्र ते जाणवत नाही. कारण महत्वाची सर्व खाती (परराष्ट्र व्यवहार,गृह, संरक्षण,अर्थ व वित्त,रस्ते विकास,रेल्वे) ही खाती त्यांनी स्वत:कडे ठेवली आहे.

अठराव्या लोकसभेत भाजपचे संख्याबळ घटले असले तरी'एनडीए'मध्ये 'मोठा भाऊ'भाजपचं असल्याचे खातेवाटपावरून दिसते. मोदी यांच्यासह 72 जणांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली.

'चारसो पार'चा आकडा गाठण्यात भाजपला अपयश आले असले तरी 'एनडीए'तील मित्रपक्षांना महत्वाची, वजनदार खाती न देता ती भाजपने आपल्याकडे ठेवली. त्यामुळे चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार हे दोन्ही बडे नेते भाजपवर राजकीय दबाब टाकण्यास कमी पडले, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.

3rd Term of Modi Government
Modi 3.0 Cabinet: मोदींचा राजीनामा नाही; केजरीवालाचं भाकीत खोटं ठरणार?

महत्वाची खाती गेल्या टर्ममध्ये ज्यांच्याकडे होती, त्यांनाच ती देण्यात आली.त्यामुळे मोदी हे 2019 प्रमाणेच कार्यशैली ठेवणार का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. मतदारांचा कौल मान्य करण्यास मोदी तयार नसल्याचा राजकीय अर्थ काढला जातो. तर दुसरीकडे मोदी यांच्याकडे महत्वाची खाती देण्यासाठी पर्याय कमी होते, असेही बोलले जाते.

चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार यांनी मोठ्या मंत्रिपदासाठी हट्ट धरला नाही. हे दोन्हीही प्रादेशिक पक्षाचे नेते आहेत, राजकीय सौदेबाजी दोघांचेही प्राधान्य भिन्न आहे. ते राज्याच्या हिताला, विकासाला महत्व देणारे नेते आहेत. मंत्रिपदावरून नायडू, नितीशकुमार फार हट्ट धरतील, असे चित्र नाही.

बिहार, महाराष्ट्रात निवडणुकांच्या तोंडावर मंत्रिमंडळात काही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुमारस्वामी यांचा जेडीएस, जितनराम मांझी, अनुप्रिया पटेल यांच्या पक्षांनाही कमी जागा मिळाल्या तरीही त्यांना कॅबिनेट मंत्रिपदे देऊन मोदींनी त्यांना मंत्रिमंडळात मानाचे पान दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com