मुंबई कॉंग्रेसच्या नेत्यांना उपवास सोसवेना 

मुंबई कॉंग्रेसच्या नेत्यांना उपवास सोसवेना 
Published on
Updated on

मुंबई ः जातीय सलोखा व सामाजिक ऐक्‍यासाठी सामुहिक उपवास कॉंग्रेसने केला आहे. महात्मा गांधींपासून ते राहूल गांधी पर्यंत उपवासाची ही कॉंग्रेसची परंपरा आहे. असे सांगणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांनी अवघ्या काही मिनिटातच उपहास मंडपातून काढता पाय घेतला. त्यामुळे मुंबई कॉंग्रेसच्या नेत्यांनाच उपवास सहन झाला नाही काय अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. 

देशात वाढत चाललेली एकाधिकारशाही, दडपशाही आणि त्यामुळे बिघडत चाललेला सामाजिक सलोखा याविरोधात कॉंग्रेसने देशभर सामुहिक उपवास करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मुंबईतही महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर उपावास आंदोलनासाठी स्टेज उभारण्यात आला होता. सर्व कार्यकर्त्यांना सकाळी दहा वाजताची उपवास आंदोलनाची वेळ दिली होती. मात्र मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम आंदोलनासाठी उशीरा पोहचले. 

आंदोलनाचे सोपस्कार आवघ्या काही मिनिटात पार पाडले आणि काही मिनिटातच आंदोलन ठिकाणावरून काढता पाय घेतला. त्यामुळे एकदिवसीय उपवास आंदोलन अवघ्या काही मिनिटातच मुंबईच्या नेत्यांनी का गुंडाळले अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. याबाबत निरूपम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही. मात्र हे आंदोलन दोन तासांचेच होते अशी माहिती निरूपम यांच्या स्वीय सहाय्य यांनी दिली. मात्र आंदोलनानंतर काही नेते आणि कार्यकर्ते आसपासच्या हॉटेलमध्ये अल्पोअहार घेतानाही दिसत होते. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com