पुणे: दुधउत्पादकांना दर वाढवून मिळण्यासाठी केंद्र शासनाने दुध भुकटीसाठी 20 टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. त्यासोबत दुग्धजन्य पदार्थ व दूध पावडरवर 40 टक्के आयात शुल्क लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दूधदर वाढवून देण्यासाठी राज्य शासनाने दूध भुकटी उत्पादकांसाठी प्रति किलो 50 रुपये अनुदान जाहीर केले आहे. तसेच मध्यान्ह भोजन, तसेच इतर शासकीय योजनांत भुकटी देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. त्यामुळे 21 जुलैपासून 3 रुपये तर नंतर 2 रुपये वाढविण्याचे काही खाजगी, सरकारी दूध संघांनी जाहीर केले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु आहे. त्याचा दूध संकलनावर मोठा परिणाम झाला असून दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कार्यकर्ते हल्ले करत आहेत.
यासंबंधाने विधीमंडळात तीन वेळा चर्चा झाली आहे. मात्र निर्णय झाला नव्हता. काही निर्णय केंद्र सरकारशी संबंधित होते. आज केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यासंबंधाने निर्णय घेण्यासाठी नागपूर अधिवेशनात आले होते. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात ही बैठक झाली. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यासह विरोधी पक्षनेते उपस्थित होते.
या बैठकीनंतर माहिती देताना गडकरी म्हणाले, दुग्धजन्य पदार्थ आणि भुकटीवर 40 टक्के आयातशुल्क लावण्याचा निर्णय झाला आहे. केंद्र शासन भुकटी तयार करणाऱ्यांना 20 टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. माध्यान्ह योजनेत दूध वितरण करण्यात येणार आहे. आदिवासींच्या योजनेतही दूध दिले जाणार आहे. या निर्णयाला केंद्रियमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सहमती दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.