Operation Lotus in Maharashtra : महाराष्ट्रात भाजप खासदारांची संख्या घटणार : तावडे समितीच्या अहवालानंतर राज्यात ‘ऑपरेशन लोटस’

माजी मंत्री विनोद तावडे यांच्या तीन सदस्यीय समितीने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भाजप पक्षश्रेष्ठींना दिला.
Vinod Tawde-Ajit Pawar
Vinod Tawde-Ajit PawarSarkarnama

मुंबई : महाराष्ट्रात आगामी निवडणुकीत भाजपचे (BJP) खासदार घटणार आहेत. लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत २२ ते २५ च्या पुढे भाजप आणि शिंदे गटाच्या खासदारांची संख्या जाऊ शकत नाही, असा अहवाल माजी मंत्री विनोद तावडे (Vinod Tawade) यांच्या तीन सदस्यीय समितीने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भाजप पक्षश्रेष्ठींना दिला. त्यानंतर राज्यात ‘ऑपरेशन लोटस’ सुरू झाले आहे. त्यातूनच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाण्याची चर्चा सुरू झाली होती. केवळ अजित पवारच नव्हे तर काँग्रेसच्या बड्या नेत्यांवरही भाजपने लक्ष्य केंद्रीत केले आहे. (Number of BJP MPs will decrease in Maharashtra: Tawde committee report)

भारतीय जनता पक्षाकडून विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची एक समिती तयार करण्यात आली हेाती. या समितीने संपूर्ण भारतात भाजपची लोकसभा जागांबाबतचा काय स्थिती आहे, त्याचा अहवाल द्यायचा होता. त्या समितीने महाराष्ट्राच्या संदर्भात दिलेला अहवाल जागा नकारात्मक होता. त्यात महाराष्ट्रातील जागा घटतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता.

Vinod Tawde-Ajit Pawar
Dhananjay Munde News : ‘सगळं काही ठीक आहे, परफेक्टली वेल’ : अजितदादांना भेटलेल्या धनंजय मुंडेंचे सूचक विधान

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या माध्यमातून ४२ खासदार नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे करता आले होते. मात्र, लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत खासदारांची संख्या घटेल, असे अहवाल म्हटले होते. खासदारांची संख्या दोन आकड्यात घटण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे २२ ते २५ च्या वर खासदार निवडून येणार नाहीत, असेही तावडे समितीच्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

Vinod Tawde-Ajit Pawar
Ajit Pawar News : चर्चा अजित पवारांची; पण काँग्रेसचा एक बडा नेता भाजपच्या गळाला?

तावडे समितीचा अहवाल भाजप पक्षश्रेष्ठींनी अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. त्यानंतर पडद्यामागे जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातून अजित पवार नॉट रिचेबल असणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी तातडीने दिल्ली गाठणे, या सर्व घडामोडींवरून राज्यात ऑपरेशन लोटस सुरू असल्याचे दिसून येत आहे.

या ऑपरेशन लोटसमध्ये केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचेच नव्हे तर काँग्रेस पक्षाचे नेतेही भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. कारण, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या जागा घटणार या अंदाज आल्यानेच पक्षश्रेष्ठींनी हे ऑपरेशन लोटस सुरू केले आहे. लोकसभेच्या २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये भाजपचे होणारे नुकसान टाळण्याचा पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न आहे.

Vinod Tawde-Ajit Pawar
Ajit Pawar On Sanjay Raut : तुमच्या पक्षाचं बघा; आमच्याबद्दल का बोलता? अजितदादांनी राऊतांना सुनावलं !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या कारभाराच्या जोरावर लोकसभेत भाजप २२ ते २५ वर जाऊ शकत नाही, असे तावडे समितीने म्हटले आहे. त्यामुळे होणारे १५ ते १८ खासदारांचे नुकसान भरून काढण्यासाठी भाजपकडून चाचपणी सुरू आहे. त्यातूनच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मोठ्या नेत्यावर भाजपने लक्ष केंद्रीत केले होते. त्यांना पक्षासोबत जोडण्यासाठी नियोजन सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com