मुंबई : ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी OBC reservation) आरक्षणाबाबत पाठपुरावा करत आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी ओबीसींचे आरक्षण लागू झालेले असेल, तशी ऑर्डर घेण्याचा प्रयत्न सरकारचा सुरू आहे. ओबीसींना आरक्षण मिळायला हवे, हाच प्रयत्न सरकारचा आहे, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी स्पष्ट केली. (OBCs to get reservation before elections : Dilip Walse Patil)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, मध्य प्रदेश सरकारने इम्पॉरिकल डेटा सादर केल्यानंतर त्यांना ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने बहाल केले आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्याही आशा वाढल्या आहेत. राज्य सरकारकडून ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करण्यात येत आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे जातीने किल्ला लढवत आहेत. त्यामुळेच वळसे पाटील यांनी वरील भूमिका मांडली आहे.
मनसेने ब्रजभूषण सिंह आणि शरद पवार यांचे फोटो ट्विट केल्याबद्दल वळसे पाटील म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार हे अनेक वर्षांपासून कुस्ती संघटनेचे पदाधिकारी आहेत. खासदार ब्रजभूषण सिंह हेही सदस्य आहेत, त्यामुळे मनसेने जो फोटो ट्वीट केला आहे, त्याचा राजकारणाशी काही संबंध लावू नये. राज्यसभा उमेदवाराबाबत वळसे पाटलांनी ‘या सगळ्या प्रक्रियेत मी नाही, त्यावर आमचे प्रदेशाध्यक्ष बोलतील,’ असे उत्तर दिले.
औरंगजेब आणि समाधी असे जुने विषय काढून अस्वस्थता वाढवली जात आहे. मशिदीवरील भोंग्यांचा वाद निर्माण करुन वातावरण अस्थिर करण्याचा प्रकार निषेधार्ह आहे. सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे; परंतु कोण कृती करत असेल तर पोलीस नक्की कारवाई करतील, असा स्पष्ट इशारा देतानाच काहीजण नवनवीन क्लृप्त्या काढून वातावरण गढूळ करण्याचे काम करत आहेत, असेही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
मी पहिल्यापासून हेच सांगत आहे की, नवाब मलिक यांना गुंतविण्याचा प्रकार होत आहे. मलिक यांनी बरीच वर्षे सार्वजनिक जीवनात काम केले आहे. नवाब मलिक हे निर्दोष आहेत, असेही वळसे पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.