India-Pak border tension : पाकिस्तान अविश्वासू, तब्बल चार वेळा केले होते शस्त्रसंधी समझोत्याचे उल्लंघन; आता काय होणार?

Pakistan ceasefire violations News :पाकने शस्त्रसंधीची घोषणा केली असली तरी या लिखित व मौखिक कराराचे एक दोन वेळा नाही तर तब्बल चार वेळा उल्लंघन केले असल्याचे पुढे आले आहे.
India-Pakistan border tensions
India-Pakistan border tensionssarkarnama
Published on
Updated on

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दशतवादी हल्ल्यानंतर भारताने त्याचा बदला घेतला. पाकिस्तानला त्याची औकात दाखवत भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जेरीस आणले. भारताने पाकिस्तानमधील दशतवाद्याचे नऊ स्थळे उध्वस्त करीत कधीही विसरू शकणार नाही, अशी कारवाई केली. या कारवाईमुळे पाकिस्तानला नमती भूमिका घ्यावी लागली. त्यानंतर चार दिवसातच पाकने अमेरिकेला मध्यस्थी करायला सांगून युद्धविरामाची घोषणा केली.

दुसरीकडे मात्र, पाकने शस्त्रसंधीची घोषणा केली असली तरी या लिखित व मौखिक कराराचे एक दोन वेळा नाही तर तब्बल चार वेळा उल्लंघन केले असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे शस्त्रसंधीचा पाकने समझोता केला असला तरी आता येत्या काळात त्याचे पालन केले जाणार की नाही? याकडे सर्वांचे लकसह असणार आहे.

पाकिस्तान कधीच कराराचे पालन करत नाही. हे यापूर्वी अनेक वेळा उघड झाले आहे. पाकिस्तानने गेल्या काही वर्षात शस्त्रसंधीचे समझोत्याचे पालन केले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच भारताला (India) आतापर्यंत वेळोवेळी कठोर पावले उचलावी लागली आहेत. आजपर्यंतचा इतिहास पहिला तर पाकिस्तनाने कधीच मौखिक किंवा लिखित कोणत्याही कराराचे कधीच पालन केलेले नाही. त्याच कारणामुळे जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाईस पाकिस्तान जबाबदार असल्याचे पुढे आले आहे.

India-Pakistan border tensions
India Pakistan War : बलोच आणि पाकिस्तानच्या युद्धाचा भारताला असाही फायदा!

1984 मधील एप्रिल महिन्यात भारतीय सैन्याला जगातील सर्वात दुर्गम व उंच भाग असलेल्या सियाचीन येथे तळ ठोकावा लागला होता. कारण पाकिस्तनाने कराराचे उल्लंघन करीत भारताच्या अनेक भागावर सैन्य वाढवले होते. त्यामुळे भारताला त्याची दखल घेत त्या ठिकाणी खडा पहारा द्यावा लागला होता.

India-Pakistan border tensions
India-Pakistan Ceasefire : पाकिस्तानने साजरा केला 'यौम-ए-तशक्कूर', शस्त्रसंधीसोबत आहे कनेक्शन

1995 मध्ये जम्मू-काश्मीरमधील सीमेवर ताराचे कुंपण घालण्याचे काम सुरु असताना त्यावेळी देखील असाच प्रकार घडला होता. काम सुरू असताना पाककडून गोळीबार करण्यात आल्याने भारतीय सैन्य दलाने देखील त्याचप्रमाणे चोख प्रत्युत्तर दिले होते. कुंपण घालण्याच्या कालावधीतही पाकने समझोता तोडला होता.

India-Pakistan border tensions
India Pakistan ceasefire Live : गडचिरोलीत 10,000 क्विंटल धान घोटाळा

1999 साली कारगिल युद्ध होण्यापूर्वी भारत-पाक सीमावर्ती भागात या ठिकाणच्या थंड हवामानामुळे शेतीलगतच्या रिकाम्या होणाऱ्या चौकीवर ताबा मिळवणार नाही, असा समझोता झाला होता. परंतु पाकच्या सैन्यांनी असा समझोता कधीही मानलाच नाही. त्यामुळेच भारत-पाकिस्तनमध्ये त्यावेळी कारगिल युद्ध झाले. याच कारणामुळे 1999 च्या कारगिल युद्धानंतर या दुर्गम भागात भीषण थंडीच्या काळातही या ठिकाणी भारतीय सैन्य दलाचे जवान पाकिस्तानी लष्कराच्या समोर निधड्या छातीने उभे असतात.

India-Pakistan border tensions
India Pakistan ceasefire Live : गडचिरोलीत 10,000 क्विंटल धान घोटाळा

2025 मध्ये जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 जणांना प्राण गमवावा लागला होता. भारताने त्याचा बदला घेताना पाकिस्तानला त्याची औकात दाखवत ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून धडा शिकवला आहे. भारताने सिंधू ऑपरेशन राबवत पाकिस्तनाचे मोठे नुकसान केले आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानला नमती भूमिका घ्यावी लागली. त्यानंतर चार दिवसातच पाकने अमेरिकेला मध्यस्थी करायला सांगून युद्धविरामाची घोषणा केली आहे.

पाकिस्तानने जरी शस्त्रसंधीची घोषणा केली असली तरी त्याचे येत्या काळात पालन केले जाणार का याबाबत सर्वांनाच शंका आहे. दोन्ही देशादरम्यान शनिवारी रात्री समझोता झाल्यांनतर रात्री तीन तासानंतरच पाकिस्तानने युद्धबंदीची उल्लंघन केल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे येत्या काळात पाकिस्तानच्या अविश्वासार्हतेमुळे भारताला नेहमीच सज्ज राहावे लागणार आहे.

India-Pakistan border tensions
DGMO India Pakistan : DGMO म्हणजे कोण? हे अधिकारी भारत-पाक युद्धांचं भवितव्य ठरवणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com