Modi 3.0 Cabinet: लोकसभेला निराशा: मंत्रिमंडळाच्या रचनेतून शिवसेना-राष्ट्रवादीला भाजपचा संदेश?

PM Narendra Modi Oath Ceremony: ७२ मध्ये ६१ आपले मंत्री करून भाजपने आपला वरचष्मा ठेवला आहे. खातेवाटपातही संरक्षण, गृह, अर्थ यासारखी महत्वाचे विभाग आपल्याकडे घेऊन ते आपला दरारा कायम ठेवण्याची शक्यता आहे.
Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama

Pimpri News : केंद्रात सत्तेची हॅटट्रिक केलेल्या एनडीएच्या सरकारचा (Modi 3.0 Cabinet) काल शपथविधी झाला. त्यात सात खासदार असलेल्या महायुतीतील शिंदे शिवसेनेने एक कॅबिनेट आणि एका राज्यमंत्री पदाची मागणी केली होती.

पण, त्यांना एकच आणि ते ही राज्यमंत्री पद देऊन भाजपने त्यांची बोळवण केली.दुसरीकडे एकही खासदार निवडून न आलेल्या आरपीआय ला सलग तिसऱ्यांदा मंत्रीपद दिल्याने त्याची मोठी चर्चा आहे.

एक खासदार असलेली अजित पवार गट (Ajit Pawar) राष्ट्रवादीही कॅबिनेटसाठी आग्रही होती. पण,त्यांनाही राज्यमंत्रीपदच देऊ करण्यात आले होते.पण, त्यांनी ते स्वाभिमान दाखवित न घेतल्याने ती मंत्रीपदापासून केंद्रात वंचितच राहिली. त्यांना विस्तारात ते मिळेल,अशी आशा आहे. पण, तब्बल ७२ जणांचे हे जंबो मंत्रीमंडळ असल्याने लगेचच त्याचा विस्तार होण्याची शक्यता कमी आहे.

७२ मध्ये ६१ आपले मंत्री करून भाजपने आपला वरचष्मा ठेवला आहे. खातेवाटपातही संरक्षण, गृह, अर्थ यासारखी महत्वाचे विभाग आपल्याकडे घेऊन ते आपला दरारा कायम ठेवण्याची शक्यता आहे.

देशात चार सौ पार, तर महाराष्ट्रात ४५ प्लसचा नारा भाजपने दिला होता. पण, मतदारांनी तो झिडकारला. महाराष्ट्रातील निराशाजनक कामगिरीचा देशात चार सौ पार करण्यात हातभार लागला.

त्यातही राज्यात महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. त्याची फळे त्यांना लगेचच भाजपने मंत्रीमंडळात नगण्य स्थान देऊन भोगावयास लावल्याची चर्चा रंगली आहे.

Narendra Modi
Somnath Bharti: मोदी स्वबळावर जिंकले नाहीत; 'मुंडण' करण्याच्या शपथेवरून सोमनाथ भारती यांचा 'यु टर्न'

शिवसेनेच्या प्रताप जाधव या चौथ्यांदा निवडून आलेल्या खासदाराला कॅबिनेट मंत्री करतील,असा होरा होता. कारण तशी मागणीच होती.पण, ती ही पूर्ण केली गेली नाही.त्यामुळे शिवसेनेत नाराजी पसरली आहे.तशीच ती राष्ट्रवादीत आहे. कारण त्यांना,तर राज्यमंत्री पदही दिले गेले नाही.

दुसरीकडे एकही खासदार नसलेल्या आरपीआयला ते देऊन राष्ट्रवादीच्या जखमेवर मीठच चोळले गेले आहे. त्यांचे अध्यक्ष रामदास आठवले यांना मंत्री करण्यात आले आहे. राष्ट्रवादीसह शिवसेनेवर त्यांच्या लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीमुळे सूड उगविल्याची कूजबूज यातून ऐकायला मिळाली.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com