
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानंतर त्यांच्या निवृत्तीबाबत चर्चा सुरू झाली असली तरी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी हे सर्व अंदाज फेटाळून लावले.
ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांच्या मते, मोदी २०२७ पूर्वी राजकारणातून निवृत्त होणार नाहीत, आणि २०२७–२०३० दरम्यान नवीन वारसदार निश्चित होण्याची शक्यता आहे.
भाजपचा ७५ वर्षांचा नियम अडवाणी व जोशी यांच्यावर लागू झाला असला तरी मोदींसाठी तसा निर्णय सध्या घेण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानंतर ते राजकारणातून निवृत्त होतील अशी चर्चा विरोधकांनी लावून धरली आहे. मोदींच्या निवृत्तीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संकेत दिल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले आहे. पण मोदी निवृत्त कधी होणार, त्यांचे वारसदार कोण असणार याबाबत त्यांची कुंडली काय सांगते हे पाहू यात!
"पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण करणार असून, त्या निमित्ताने त्यांच्या निवृत्तीविषयी चर्चा सुरू झाली आहे. योगायोगाने सरसंघचालक मोहन भागवतही वयाची ७५ वर्षे पूर्ण करीत आहेत. मोदी यांची जन्मतारीख १७ सप्टेंबर १९५० असून, मोदी यांच्या पत्रिकेचा विचार करता जून २०२७मध्ये शनीचा मेष राशीतील प्रवेश राजकीय निवृत्तीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. याचा अर्थ जून २०२७पर्यंत मोदी निवृत्त होणार नाहीत," असे पुण्यातील ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाले,
"जून २०२७ ते २०३०पर्यंत शनी मेष राशीत भ्रमण करणार आहे. देशात मे २०२९मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. यापूर्वी दोन वर्षे म्हणजे जून २०२७नंतरच्या काळात मोदींचा वारसदार निश्चित होण्याची शक्यता आहे," असे मारटकर म्हणाले.
मारटकर म्हणाले, "जून २०२७ नंतर मेष राशीतील शनीचे भ्रमण भारतीय राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता असून, निवडणुकीपूर्वी अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या निवृत्तीची घोषणा होण्याची शक्यता राहील. नवीन नेतृत्वाच्या हाती देशांची धुरा येण्याची शक्यता असून, मंत्रिमंडळात मोठे बदल होतील, असे वाटते,"
मोदी येत्या सप्टेंबर महिन्यात ७५ वर्षांत पदार्पण करत आहेत. ७५ वर्षांत सेवानिवृत्त हा नियम भाजपचा असून लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना ७५ वर्षांचा भाजपचा नियम लागू करण्यात आला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर महिन्यात ७५ वर्षांचे झाल्यानंतर त्यांना सेवानिवृत्त घ्यावी लागेल, असा हल्लाबोल यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे.
२०१९ च्या निवडणुकीत भाजपचा महाराष्ट्रात पराभव झाला. त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी बहुमताचा आकडा गाठू शकले नाहीत. स्वतः नरेंद्र मोदी यांनीच पक्षात ७५ वर्षाचा सेवानिवृत्तीचा नियम केला. हा नियम लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना लागू होता. त्यामुळे येत्या सप्टेंबर महिन्यात मोदी ७५ वर्षाचे होत आहेत, त्यामुळे त्यांना नियमाने निवृत्त व्हावे लागणार आहे, असे राऊतांचे म्हणणे आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदींच्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दोन दिवसापूर्वी मोहन भागवत यांनी स्पष्टपणे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 व्या वर्षी निवृत्त होणार नाहीत. त्यांनी असेही स्पष्ट केले की ते स्वतः कधीही 75 व्या वर्षी निवृत्त होतील असे म्हणाले नाहीत. जोपर्यंत संघाची गरज असेल, तोपर्यंत आपण काम करत राहू, असेही ते म्हणाले.
मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानंतर ते राजकारणातून निवृत्त होतील अशा सर्व चर्चा मोहन भागवत यांनी फेटाळून लावल्या. ते म्हणाले, "मी कधीही 75 व्या वर्षी निवृत्त व्हावे असे म्हटले नाही. निवृत्ती ही वैयक्तिक बाब नसून ती संघाच्या कामाशी जोडलेली आहे. संघ आम्हाला जे सांगेल तेच आम्ही करू."
Q1: मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्त होतील का?
A1: नाही, मोहन भागवत यांनी स्पष्ट केले की मोदी ७५ व्या वर्षी निवृत्त होणार नाहीत.
Q2: ज्योतिषानुसार मोदी कधीपर्यंत सक्रिय राहतील?
A2: जून २०२७ पर्यंत ते सक्रिय राहतील, त्यानंतर मोठे बदल संभवतात.
Q3: भाजपचा ७५ वर्षांचा नियम काय सांगतो?
A3: या नियमानुसार ७५ वर्षांनंतर वरिष्ठ नेत्यांना सेवानिवृत्ती घ्यावी लागते.
Q4: मोदींच्या वारसदाराबाबत काय अंदाज वर्तवला गेला आहे?
A4: २०२७ नंतर वारसदार निश्चित होण्याची शक्यता असल्याचे ज्योतिषांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.