पुणे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांची गणेशोत्सवापूर्वी बदली? 

आयुक्तांच्या कारभाराच्या तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालून भाजपचे पदाधिकारी त्यांच्या बदलीवर अडून बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे, आयुक्तपदाची सूत्रे घेऊन कुणाल कुमार यांना येत्या 22 ऑगस्टला तीन वर्षे पूर्ण होणार असल्याने त्यांची बदली निश्चित मानली जात आहे.
पुणे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांची गणेशोत्सवापूर्वी बदली? 
Published on
Updated on

पुणे : महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यातील सवता सुभ्याचे परिणाम महापालिकेत जाणविण्याचे चिन्हे निर्माण झाली आहे. गणेशोत्सवापूर्वी कुणाल कुमार यांची मुंबईत बदली होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

केंद्र सरकारच्या "स्मार्ट सिटी' प्रकल्पाची काही प्रमाणात अंमलबजावणी होईपर्यंत कुणाल कुमार यांना पुण्यात ठेवले जाण्याचा अंदाज होता. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने चर्चेत असलेल्या समान पाणीपुरवठा योजनेती जलवाहिन्या, "डक्‍ट' आणि कात्रज-कोंढवा रस्त्याच्या निविदा प्रक्रियेवरून कुणाल कुमार अडचणीत आले आहेत. जलवाहिन्या आणि रस्त्याच्या कामाच्या फेरनिविदा काढल्या आल्या. त्यावरूनही बराच खल झाल्याचे दिसून आले. या पार्श्‍वभूमीवर कुणाल कुमार यांच्या बदलीची शक्‍यता दाट असल्याचे महापालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले. 


दुसरीकडे, शहरातील महत्त्वाच्या विशेषत: समान पाणीपुरवठा, "डक्‍ट', शाळांमधील "ई-लर्निंग' या योजनावरून भाजपचे पदाधिकारी आणि कुणाल कुमार यांच्यात वेळोवेळी वाद झाला. समान पाणीपुरवठा योजनेचा वाद राज्य सरकारच्या दरबारात गेला. तर, "ई-लर्निंग'च्या प्रस्तावरून स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आणि कुणाल कुमार यांच्यात खडाजंगी झाली.

"हा प्रस्ताव मंजूर करा अन्यथा राज्य सरकारकडून मंजूर करेल,' अशा शब्दांत कुणाल कुमारांनी मोहोळांना सुनावले होते. त्यावरून या दोघांचे अजिबात पटत नाही. आयुक्तांच्या कारभाराबाबत मोहोळ यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. पुण्यात गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला आल्यानंतर मुख्यमंत्री आणि मोहोळ यांच्यात खासगी चर्चाही झाली होती. त्याचाच परिणाम म्हणून की काय दोनच दिवसांत आयुक्तांच्या बदलीची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

"महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मात्र, आयुक्तांची तक्रार केली नाही. महापालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत कोणतीच चर्चा झालेली नाही,'' असे मोहोळ यांनी सांगितले. 

महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची सत्ता असतानाही कुणाल कुमार हे भाजप नेत्यांशी जवळीक साधून असल्याचे बोलले जात होते. पण, महापालिकेतील सत्तांतरानंतर कुणाल कुमार यांची कार्यपद्धतीवरून वादाच्या घटना घडत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आले. अशा घटना पक्षाला परवडणाऱ्या नसल्यानेच तीन वर्षे पूर्ण झाल्याचे कारण पुढे करीत कुणाल कुमार यांना पुण्यातून हलविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com