PMC Election Results 2026: होय, मी बाजीरावच! म्हणणाऱ्या अजितदादांना पुण्यात दोन दाढीवाल्या पहिलवानांनी लोळवलं

PMC–PCMC Election Results 2026: भाजपच्या दोन तगड्या पहिलवानांना अजितदादांनी आवाहन दिले होते. त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगला. या तीन पहिवानाच्या 'कुस्ती'कडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मोहोळ-लांडगे यांनी डाव टाकत अजितदादांना चीतपट केले.
PMC–PCMC Election Results 2026 | BJP Defeats Ajit Pawar’s NCP in Pune, Pimpri-Chinchwad
PMC–PCMC Election Results 2026 | BJP Defeats Ajit Pawar’s NCP in Pune, Pimpri-ChinchwadSarkarnama
Published on
Updated on

Pune News: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मोठा हादरा बसला आहे. महापालिका निवडणूक प्रचारात अजित पवार यांनी पुणे, पिंपरी-चिंचवडच्या नेत्यांवर सडकून टीका केली. त्याला भाजप नेत्यांनी उत्तर दिले.

प्रचारात राजकीय पहिलवान अजित पवार विरुद्ध प्रत्यक्ष तालमीत तयार झालेले पहिलवान खासदार मुरलीधर मोहोळ आणि दुसरे पहिलवान भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यात 'कुस्ती'रंगली. भाजप पहिलवान खासदार-आमदारांनी अजितदादांना पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या मातीत लोळविले.

भाजपच्या दोन तगड्या पहिलवानांना अजितदादांनी आवाहन दिले होते. त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगला. या तीन पहिवानाच्या 'कुस्ती'कडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मोहोळ-लांडगे यांनी डाव टाकत अजितदादांना चीतपट केले. प्रचाराला सुरुवात झाल्यापासून अजितदादा हे पुण्यात मुरलीअण्णा, आमदार हेमंत रासने आणि गणेश बीडकर यांच्यावर तर पिंपरीत महेश लांडगे यांच्यावर तुटून पडले. त्यांना भाजप नेत्यांनी सडेतोड उत्तर दिले.

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी मोहोळ-लांडगे यांच्याविरुद्ध दंड थोपडल्याने खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळ देत निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली. आपला बालेकिल्ला असलेल्या पुणे आणि पिंपरीत अजितदादा तळ ठोकून होते. रासने-मोहोळ-बिडकर यांच्यावर महापालिकेतील टेंडर प्रक्रियेत कसा भष्ट्राचार झाला, असे सांगत या तिघांना जेरीस आणले.

शरद पवारांनी स्वाभिमानाच्या मुद्द्यावरून काँग्रेसशी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस काढली होती. पण पवार कुटुंब फक्त स्वतःचा स्वाभिमान जपत बसले, पण इतरांचा स्वाभिमान त्यांनी दुखावला हाच स्वाभिमानाचा मुद्दा भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवड मध्ये उचलला. त्यांना पिंपरी चिंचवडकरांनी चांगली साथ दिली. फडणवीसांनी महेश लांडगे यांना 'रसद' पुरवली. पिंपरी महेश लांडगे यांनी अजितदादांना धोबीपछाड दिला.

PMC–PCMC Election Results 2026 | BJP Defeats Ajit Pawar’s NCP in Pune, Pimpri-Chinchwad
Raj Thackeray : काय चुकलं? काय कमी पडलं? 6 नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील!पराभवानंतर राज ठाकरेंची भावूक पोस्ट

भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सुरू झालेले शाब्दीक युद्ध रंगले, माजी नगरसेवकांची फोडाफोडी, स्थानिक-बाहेरचा वाद यामुळे भोसरीतील ११ प्रभागांमधील लढती लक्षवेधी ठरल्या. अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोपात अजितदादा आणि महेशदादांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पुण्यात राष्ट्रवादीला 26 तर पिंपरी-चिंचवडमध्ये 37 जागा मिळाल्या आहेत.

पुण्यात अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात सामना रंगला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात जोरदार वाकयुद्ध झाले. हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका-प्रतिटीका करत आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आमनेसामने आले आहेत. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनावर फडणवीसांनी तोंडसूख घेतले होते.

अजितदादांनी दिलेल्या आश्वासनावर 'खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा', असं म्हणत फडणवीसांनी अजितदादांना डिवचलं होते. फडणवीसांनी केलेली टीका अजित पवारांच्या जिव्हारी लागली होती. “होय, मी बाजीरावच आहे,” असं अजित पवार म्हणाले.अजित पवारांनी थेट उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली होती. फडणवीस-अजितदादांना याच्यांतली जुगलबंदीमुळे पुणेकरांची चांगलीच करमणूक झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com