पुनम महाजनांना परप्रांतियांचा एवढा पुळका का ? : बाळा नांदगावकर 

पुनम महाजनांना परप्रांतियांचा एवढा पुळका का ? : बाळा नांदगावकर 

मुंबई : एकिकडे अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा ताजा असताना 'उत्तर भारतीय मुंबईतुन हद्दपार झाल्यास मुंबई पन्नास टक्के बंद पडेल, असे वक्तव्य खासदार पूनम महाजन यांनी केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात आता आयत कोलीत मिळाले आहे. महाजन यांना पारप्रांतीयांचा पुळका कशासाठी ? असा सवाल मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी 'सरकारनामा' शी बोलताना उपस्थित केला. 

महाजन राष्ट्रीय नेत्या झाल्यामुळे असे वक्तव्य करीत असतील परंतु त्यांचे वडील प्रमोद महाजन हे पंतप्रधानपदाचे दावेदार असतानाही कधीही असे वक्तव्य केले नाही, असेही नांदगावकर म्हणाले. आम्ही कोणत्याही जातीचा विरोध करीत नाही तर अनधिकृत फेरीवाल्यांचा विरोध करीत आहोत. एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत ज्यांचा नाहक बळी गेला ते कोणी एका जातीचे नव्हते. फेरीवाले हे सुद्धा नुसते उत्तर भारतीय आहेत का ? तर त्यात सर्व जातींचा समावेश आहे. मुळात आमचा जातीवर रोष नाहीच. अनधिकृत गोष्टींचा मनसे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विरोधात आहेत, असेही नांदगावकर यांनी स्पष्ट केले. 

आम्ही कुणा एका जातीला टार्गेट करत आहोत, तसे जर कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सुद्धा मुंबईत येऊन अभिनय क्षेत्रात आपले नाव कमविले. त्यांचेही राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत तोंडभरून कौतुक केले. परप्रांतीयांचा मुंबईकडे येणारा लोंढा वाढत असून येथे राहणाऱ्या मराठी माणसाची गैरसोय होत आहे. त्यामुळेच आम्ही पारप्रांतीयांच्या विरोधात आहोत, असेही नांदगावकर म्हणाले. 

मुंबई सांभाळण्यासाठी मराठी माणूस समर्थ आहे. त्यासाठी पारप्रांतीयांची गरज नाही. मुंबई कोणावरही अवलंबून राहत नाही हे सुद्धा महाजन यांना कळायला हवे. त्यामुळे अशा प्रकारची बेताल वक्तव्य करणे पूनम महाजन यांना शोभत नाही असे नांदगावकर म्हणाले. संजय निरुपम नंतर पूनम महाजन यांनी परप्रांतीयांचा मुद्दा नव्याने छेडल्याने मनसे मधून नाराजी व्यक्त होत आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com