Lok Sabha Election 2024 : हे तर हातावर 'मेरा बाप चोर है....' लिहिण्यासारखेच !

VBA on MVA : दीवार पिक्चर मधील आनंदबाबुच्या दोघा मुलांपैकी एका अर्थात विजय (अमिताभ बच्चन) याच्या हातावर 'मेरा बाप चोर है....' असे कामगारांनी गोंदविले होते. अगदी त्या प्रमाणे एक अट आज वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातील पत्रकार परिषदेत ठेवली आहे.
Deewar, Prakash Ambedkar
Deewar, Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुक जसजशी जवळ येत आहे. तसे तसे वंचित नेत्यांनी महाविकास आघाडीसोबत युती करताना नवनवीन अटी ठेवण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात वंचित महाविकास आघाडी सोबत आल्यावर त्याचा निश्चित फायदा इतर घटक पक्षांना होणार आहे. वंचित च्या या आघाडीने लोकसभेत महाविकास आघाडीच्या जागांमध्ये निश्चित वाढ होण्याची शक्यता आहे. पण, महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी निवडणुकीत वंचित च्या मदतीने यश संपादीत करायचे आणि निवडणुक झाल्यावर भाजप सोबत लग्नगाठ बांधायची हे टाळण्यासाठी आज लग्नापुर्वीच्या बोलणी प्रमाणे आंबेडकरांनी नवीनच अट टाकली. ही अट महाविकास आघाडीच्या नेत्यांना वधु पक्षाच्या भुमिकेत आणणारी असून ती जर मंजुर केली नाही तर लग्नसंबंध होणार नाही, अशी काय ती तयारी वंचित ने सुरु केल्याचे चित्र आहे.

'दीवार' पिक्चर मधील आनंदबाबुच्या दोन पैकी एक मुलगा विजय अर्थात अमिताभ बच्चन याच्या हातावर 'मेरा बाप चोर है....' असे कामगारांनी गोंदविले होते. अगदी त्या प्रमाणे एक अट आज वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातील पत्रकार परिषदेत ठेवली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पुर्व इतिहास पाहता आणि सेक्युलर मतदारांना आश्वासित करण्यासाठी 'भाजप सोबत युती करणार नाही....' असे लेखी स्वरुपात लिहून घेण्याची अट आंबेडकर यांनी समोर केली आहे. महाविकास आघाडीच्या नेमक्या कुठल्या घटक पक्षावर आंबेडकर यांनी संशय उपस्थित करत कोडींत पकडले आहे ?, असा प्रश्न या निमित्त उपस्थित होतो. उध्दव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फुटून त्या पक्षाचे आमदार, खासदार हे भाजप च्या गळाला लागले आहे. त्याच बरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी थेट भाजप मध्ये प्रवेश केला, असे असताना आता वंचित नेत्यांना महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपैकी, भाजप सोबत कुणी जाणार आहे काय किंवा त्याची कुणकुण लागली काय, असा संशय बळावत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Deewar, Prakash Ambedkar
Uddhav Thackeray News: धाराशिवच्या बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

वंचित ने भविष्यात भाजप च्या नादी कोणी लागू नये, यासाठी केलेली ही व्यूहरचना असावी. आणि तसे झालेच तर आम्ही तर लिहून घेतले होते की 'भाजप सोबत जाणार नाही....' तेव्हा प्रत्येक वेळ किंवा लोकसभेनंतर विधानसभेत वंचित हे मतदारांना दाखविणार की या पक्षाने लिहून दिले होते की, आम्ही भाजप सोबत जाणार नाही. तेव्हा मतदारांची प्रताडना आणि महाविकास चा विश्वासघात करणारे उघड पडतील. सेक्युलर मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि त्यांच्या मतांची अवहेलना होऊ नये. यासाठी आज वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी मतदारांच्या हिताचे तर संरक्षण केलेच पण, राजकीय पक्षांना बंधनात अडकविण्याची नामी शक्कल लढविली आहे. वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांची ही अट मान्य करणे आणि तसे लिहून देणे हे काँग्रेस, शिवसेना (उध्दव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षासाठी कोणाला शक्य आहे हे पाहण्यासारखे ठरेल. एकीकडे भाजपवर तोंडसुख घायचे आणि निवडणुकीनंतर सेक्युलर मतदारांची अवहेलना करत भाजपला साथ द्यायची. हा सर्व प्रकार रोखण्याची ही मोठी खेळी मानली जात आहे. ही अट मुळात मान्य होते की नाही यावरच पैज लागण्याची शक्यता आहे. कारण राजकारणात कोणीच कायम शत्रु नसतो तो राजकीय सोयी प्रमाणे मित्र देखील होऊ शकतो.

गेल्या निवडणुकीचा इतिहास काय सांगतो ?

2019 च्या निवडणुकीत भाजपने शिवसेने सोबत युती करत 23 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजपला 27.8 टक्के मते मिळाली होती. त्या वेळी शिवसेना 18 जागांवर विजयी झाली होती. शिवसेनेला भाजप खालोखाल 23.5 टक्के मते मिळाली होती. काँग्रेस ला 16.4 टक्के मते मिळाली होती पण, केवळ एका जागेवर काँग्रेसचा विजय झाला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस 4 जागांवर विजयी झाली होती त्यांना 15.7 टक्के मते मिळाली होती. एमआयएम एका जागेवर विजयी झाली होती त्यांना 0.7 टक्के मते मिळाली होती. 2019 च्या निवडणुकीत वंचितने काँग्रेस व राष्ट्रवादीची अनेक लोकसभा उमेदवार घरी बसवली होते. 2019 मध्ये वंचित च्या मतविभाजनाचा फटका जसा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला बसला तसाच त्या मतविभाजनाचा मोठ्या प्रमाणात फायदा हा भाजप आणि शिवसेनेला नक्कीच झाला.

लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत भाजप शिवसेनेच्या पदरी वंचितमुळे अप्रत्यक्षपणे मोठा फायदा झाला. यंदाच्या निवडणुकीत हा फायदा पदरी पाडून घेण्यासाठी महाविकास आघाडी वंचित सोबत हातमिळवणी करत आहे. वंचित नेते प्रकाश आंबेडकर हे सर्व गोष्टी राजकीय, सामाजिक गणित कसे चुक आणि बरोबर आहे याची खातरजमा करुनच कुणासोबत आघाडी करतील. आघाडी करताना आंबेडकर यांच्या सोबत च्या एक गठ्ठा दलित व ओबीसी मतदारांचा विश्वासघात होऊ नये, यासाठी चा प्रयत्न आंबेडकरांनी आता सुरु केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज 'भाजप सोबत जाणार नाही' असे लिहून घेण्याची आंबेडकरांची चाल ही केवळ लोकसभाच नाही तर विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खेळल्या गेली आहे. लोकसभा निवडणुकीत देशात मतदारांनी त्रिशंकु कौल दिला तर त्यावेळी ही लिखित अट मोलाची ठरेल.

Deewar, Prakash Ambedkar
Lok Sabha Election 2024 : तावडेंनी जाहीर केलेल्या उमेदवारी यादीत मोठी चूक; दुसरी यादी केली प्रसिध्द

या पुर्वीच्या दोन लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर भाजप लढली त्या जागांवर उध्दव ठाकरे यांची शिवसेना लढली नाही. इतकेच नाही तर ज्या जागांवर काँग्रेस लढली त्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस लढली नाही. अशा वेळी या जागांवर वंचित ने दावा केल्याने महाविकास आघाडीत चलबिचल सुरु आहे. ही चलबिचल आणि सीट शेअरींग अद्याप न झाल्याने वंचित ची नवी अट ही लग्न मोडण्यास कारणीभूत ठरु शकते. आता लग्न कोण मोडते, हे पाहण्यासारखे ठरेल. कारण 'मेरा बाप चोर है' हे जसे अमिताभ बच्चन यांच्या हातावर 'दीवार' मध्ये लिहिले होते अगदी तसे 'आम्ही भाजप सोबत जाणार नाही' असे लिहिण्याची हिंमत महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांना दाखवावी लागेल. तरच वंचित च्या एक गठ्ठा दलित आणि ओबीसी मतांचा फायदा त्यांच्या पदरी पडेल.

Deewar, Prakash Ambedkar
Raj Thackeray : उमेदवार ठरणार होता पण राज ठाकरेंनी थेट मुंबईच गाठली; पुण्यात नेमकं काय घडलं ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com