Prakash Ambedkar News : 'वंचित'ला घेऊ नका हलक्यात; 2019 ला 14 जणांना होती लाखापेक्षा अधिक मतं

Vanchit agahdi News : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला गेल्या निवडणुकीत वंचितला हलक्यात घेणे चांगलेच महागात पडले होते. गेल्या निवडणुकीत वंचित आघाडीने एका दोन नव्हे तर तब्बल 35 लोकसभेच्या जागा लढल्या होत्या, तर 14 जागी एक लाखापेक्षा अधिक मते घेतली होती.
Prakash Ambedkar and VBA
Prakash Ambedkar and VBASarkarnama
Published on
Updated on

Political News : वंचित बहुजन आघाडीने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एकूण तब्बल 41 लाखांहून जास्त मते घेत निवडणुकीत बाजी मारली होती. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला गेल्या निवडणुकीत वंचितला हलक्यात घेणे चांगलेच महागात पडले होते. गेल्या निवडणुकीत वंचित आघाडीने एका दोन नव्हे तर तब्बल 35 लोकसभेच्या जागा लढल्या होत्या, तर 14 जागी एक लाखापेक्षा अधिक मते घेतली होती.

त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत महाविकास आघाडी वंचितला अजिबात हलक्यात घेणार नाही असे वाटत होते. मात्र, महाविकास आघाडीने शेवटपर्यंत वंचितशी जुळवून घेण्याची तयारी ठेवली होती. मात्र ऐनवेळेस वंचित आघाडीने महाविकास आघाडीशी जुळवून न घेता यंदाच्या निवडणुकीत वंचित पुन्हा स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. (Prakash Ambedkar News)

वंचित आघाडी वेगळी लढली तर त्याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसणार आहे. गेल्या निवडणुकीत वंचितसोबत एमआयएम असल्याने त्याचा वंचित आघाडीला फायदा झाला होता. यावेळेस मात्र वंचित सोबत एमआयएम नसणार आहे. त्याचा फटका कोणाला बसणार हे पाहण्यासाठी अजून काही काळ निवडणूक निकालाची वाट पाहावी लागणार आहे.

वंचित आघाडीच्या छत्रपती संभाजीनगर, सांगली येथील उमेदवाराने तीन लाखांपेक्षा अधिक मते मिळाली होती. छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे उमेदवार विजयी झाले तर अकोल्यामधील उमेदवाराने दोन लाखांपेक्षा अधिक मते घेतली होती, तर 11 ठिकाणच्या उमेदवाराने एक लाखापेक्षा अधिक मते घेतली आहेत.

2019 लोकसभा निवडणुकीत लाखभरापेक्षा अधिक मत घेतलेले 'वंचित'चे 14 उमेदवार पुढीलप्रमाणे : औरंगाबाद इम्तियाज जलील (वंचित-एमआयएम युती) (Imtiyaj Jalil) : 3, 89, 042 मते, सांगली गोपीचंद पडळकर : 3, 00, 234 मते, अकोलामध्ये प्रकाश आंबेडकर (Parakash Ambdekar) : 2, 78, 848 मते, हिंगोली मोहन राठोड : 1, 74, 051 मते, बुलढाणा बळीराम शिरस्कार : 1, 72, 627 मते, सोलापूर प्रकाश आंबेडकर : 1, 70, 007 मते, नांदेड यशपाल भिंगे : 1, 66,196 मते, परभणी आलमगीर खान : 1, 49, 946 मते, हातकणंगले अस्लम सय्यद : 1, 23, 419 मते, हातकणंगले अस्लम सय्यद : 1, 23, 419, नाशिक पवन कुमार : 1, 09, 981 मते, चंद्रपूर राजेंद्र महाडोळे : 1, 12, 069 मते, लातूर राम गिरकर : 1, 12, 255 मते, गडचिरोली-चिमूर डॉ. रमेशकुमार गजबे : 1, 11, 468 मते मिळाली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019 लोकसभा निवडणुकीत लाखभरापेक्षा कमी मत घेतलेले 'वंचित'चे उमेदवार व मतदारसंघ पुढीलप्रमाणे : उस्मानाबाद अरुण सलगर : 98,579 मते, यवतमाळ-वाशीम प्रवीण पवार : 94,228 मते, जालना डॉ. सुभाषचंद्र वानखेडे : 77, 158 मते, नंदूरबार सुशील अंतुर्लीकर : 25,702 मते, धुळे नबी अहमद अहमदुल्ला : 39,449 मते, जळगाव अंजली बाविस्कर : 37,366 मते, रावेर नितीन कंडेलकर : 88, 365 मते, अमरावती : गुणवंत देवपारे : 65,135 मते, वर्धाधनराज वंजारी : 36,452 मते, रामटेक सुभाष गजभिये : 44,327 मते, नागपूर मोहम्मद जमाल: 31,725 मते, भंडारा-गोंदिया के. एन. नान्हे : 45,842 मते , दिंडोरी बापू बर्डे : 58,847 मते, पालघर सुरेश पाडवी : 19,728 मते, भिवंडी प्रा. अरुण सावंत : 51,455 मते.

कल्याण संजय हेडाऊ : 65,572 मते, ठाणे मल्लिकार्जुन पुजारी : 47,432 मते, मुंबई उत्तर: सुनील थोरात : 15,657 मते, मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघ सुरेश शेट्टी : 23,422, मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघ निहारिका खोंदले : 68,239 मते, मुंबई उत्तर मध्य मतदारसंघ अब्दुल रहमान : 33, 703 मते, मुंबई दक्षिण मध्य संजय भोसले : 63, 412 मते, मुंबई दक्षिण डॉ. अनिल कुमार : 30348 मते, रायगड सुमन कोळी : 29,196 मते, मावळ राजाराम पाटील : 75, 904 मते, पुणे अनिल जाधव : 64,793 मते, बारामती नवनाथ पडळकर : 44, 134, शिरूर मतदारसंघ राहुल ओव्हाळ : 38,070 अहमदनगर सुधाकर आव्हाड : 31,807 मते, शिर्डी संजय सुखदन : 63,287 मते, बीड विष्णू जाधव : 92, 139, माढा मतदारसंघ विजयराव मोरे : 51,532 मते, सातारा सहदेव येवले : 40, 673 मते, रत्नागिरी- सिंधुदुर्ग मारुती जोशी : 30,882 मते, कोल्हापूर डॉ. अरुणा माळी : 63,439 मते मिळाली आहेत.

R

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com