BJP Politics: राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्यापूर्वी भाजपनं टाकला डाव

BJP plans Marathi language promotion strategy: हिंदी सक्तीच्या विरोधातील ठाकरे बंधूंची भूमिका महायुतीसाठी धोक्याची ठरेल, हिंदी सक्ती करुन महायुती मराठीची गळपेची तर करीत नाही ना? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
BJP Pune
BJP PuneSarkarnama
Published on
Updated on

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येणार आहेत. मराठी माणूस, मराठी भाषा यासाठी लढणारे हे दोन्ही बंधू मैदानात उतरत असताना दुसरीकडे आपल्या विरोधात जनमत तयार होऊ नये, म्हणून भाजपने नवी रणनीती आखली आहे.

महाराष्ट्रात हिंदीची सक्ती होत असताना मराठी भाषेबाबत प्रेम असणाऱ्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी राज-उद्धव ठाकरे येत्या पाच तारखेला एकत्र येत आहेत, अशातच भाजपने आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिला, हा मुद्या पुन्हा जनतेसमोर मांडण्यासाठी कंबर कसली आहे. मराठी भाषेच्या वाढीसाठी, संवर्धनासाठी केंद्र सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मोहीम भाजपने आखली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हिंदी सक्तीच्या विरोधातील भूमिका महायुतीसाठी आगामी निवडणुकीसाठी धोक्याची ठरेल, महायुती हिंदी सक्ती करुन राज्यात मराठीची गळपेची तर करीत नाही ना? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आणि आपण मराठीसाठी काय केले, हे सांगण्यासाठी भाजपचे पदाधिकारी आता सामान्य नागरिकांपर्यंत जाणार असल्याचे समजते.

BJP Pune
Thackeray brothers reunion: अखेर ठरलं! ठाकरे बंधू एकत्र येणार; राऊतांनी केला फोटो शेअर

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा रंगली असतानाच, दोन्ही ठाकरे बंधू हिंदी सक्तीच्या विरोधातील मोर्चाच्या निमित्ताने एकत्र येणार आहे. राजकारणासाठी एकत्र येणार की नाही, हे स्पष्ट झाले नसले तरी मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांमध्ये धडकी भरली आहे.

हिंदी सक्ती केली नसून पर्यायी भाषा म्हणून शिकावी, असे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. भाजपकडून मराठी संवर्धनासाठी आम्ही काय करीत आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com