महात्मा गांधींच्या सांगण्यावरूनच सावरकरांनी मागितली माफी!

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य...
Rajnath Singh says Lies were spread about Savarkar.
Rajnath Singh says Lies were spread about Savarkar.
Published on
Updated on

नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावरून पुन्हा एकदा देशातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath singh) आणि सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी सावरकर यांच्याविषयीच्या एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सावरकर विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. तसेच त्यांना देशातील सर्वात मोठे राष्ट्रवादी असल्याचे सांगितले.

इंग्रजांच्या कैदेत असताना सावरकर यांनी दया याचिका केली होती. त्यांनी इंग्रजांची माफी मागितल्याचा दावा केला जातो. त्यावर बोलताना राजनाथ सिंह यांनी हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. सावरकरांविषयी खोटी माहिती पसरवली जात आहे. सतत हे सांगितलं जातं की, सावरकरांनी इंग्रजांसमोर दया याचिका दाखल केली होती. पण खरं हे आहे की, त्यांनी स्वत:ची सुटका व्हावी म्हणून ही याचिका दाखल केली नव्हती. सर्वसाधारणपणे एका कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. त्यानुसार महात्मा गांधींनी (Mahatma Gandhi) सांगितल्यामुळे सावरकरांनी ही याचिका केली होती, असं वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केलं आहे.

Rajnath Singh says Lies were spread about Savarkar.
ते महापापी, जाहीर माफीशिवाय घरवापसी नाही! काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भडकले

मार्क्सवादी व लेनिनवादी विचारधारा असलेल्या लोकांनी सावरकरांना बदनाम केल्याचे सांगत राजनाथ सिंह म्हणाले, सावरकर हे स्वातंत्र्यसैनिक होते. सावरकरांवर केली जात असलेली टीका तथ्यहीन आहे. सावरकर हे देशाचे पहिले संरक्षण तज्ज्ञ होते. इतर देशांसोबत कसे संबंध असायला हवेत, यावर सावरकरांचे धोरण अगदी स्पष्ट होते.

सावरकर यांचे हिंदुत्व वेगळे

सावरकर यांचे हिंदूत्व धर्मापेक्षा वरचे होते. ते कुणासोबतही भेदभाव करत नव्हते. कुणाला त्यांच्या धर्माच्या आधारे वेगळे केले जाऊ शकत नाही, असं ते मानायचे. त्यांनी नेहमीच अखंड भारताचे स्वप्न पाहिलं. त्यांच्या हिंदूत्वाला समजण्यासाठी तुमची समज तेवढी खोलवर असायला हवी, असं राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं.

मोहन भागवत म्हणाले...

सरसंघचालक मोहन भागवत यांनीही या कार्यक्रमात सावरकरांवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, सावकर कधीही मुस्लिमांचे शत्रू नव्हते. उलट त्यांनी तर उर्दू भाषेत अनेक गझल लिहिल्या आहेत. फाळणीवेळी पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिमांची प्रतिष्ठा पाकिस्तानसाठी कधीच नव्हती. जे भारताचे होते ते भारताचेच राहणार आहेत, असे भागवत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com