Rajya Sabha Election 2024 : पराभूत हंडोरेंना ‘या’ कारणांमुळं काँग्रेसची पसंती...

Chandrakant Handore : काँग्रेसकडे काठावरची मतं असल्यानं हंडोरेंसमोर राज्यसभेवर निवडून येण्याचे आव्हान कायम...
Chandrakant Handore
Chandrakant HandoreSarkarnama
Published on
Updated on

संजय परब

Mumbai Political News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने या पक्षाला मानणाऱ्या दलित समाजात समाधानाचे वातावरण आहे. मुख्य म्हणजे विधान परिषद निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव हा जसा हंडोरे यांच्या जीवाला लागणारा होता, तसाच तो काँग्रेसला सुद्धा निराश करणारा होता.

विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा विचार करता हंडोरे यांचा पक्षाला फायदा होऊ शकतो, असा सुद्धा विचार त्यांना दिलेल्या उमेदवारीमागे आहे. मात्र भाजपने महायुतीकडून राज्यसभेसाठी सहावा उमेदवार द्यायचे ठरवल्यास हंडोरे यांच्यासमोर पुन्हा एकदा मोठे आव्हान असेल. (Rajya Sabha Election 2024 )

जून 2022 मध्ये राज्यात विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली होती. त्या निवडणुकीत काँग्रेसने (Congress) दोन उमेदवार दिले होते. त्यात भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा समावेश होता. या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला म्हणजेच काँग्रेसला मोठा धक्का बसला.

भाजपने (BJP) प्रसाद लाड या पाचव्या उमेदवाराला निवडून आणले होते. त्याचवेळी काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले. परंतु हंडोरे पराभूत झाले. महाविकास आघाडीची मते फुटल्यामुळे हंडोरे पराभूत झाले होते.

Chandrakant Handore
Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला, चंद्रकांत हंडोरेंना संधी

हंडोरे विलासराव देशमुख मंत्रिमंडळात होते. 1992 ते 1993 या कालावधीसाठी त्यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाली होती. हंडोरे हे आंबेडकरवादी आणि सामाजिक-राजकीय संघटना “भीम शक्ती”चे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. दलित चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. विधान परिषदेत त्यांचा पराभव झाल्यामुळे दलित समाजात नाराजी होती.

ही नाराजी दूर करण्यासाठी आता काँग्रेसने म्हणजे महाविकास आघाडीने त्यांना उमेदवारी दिली आहे. परंतु यंदाही भाजप सहावी जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामुळे हंडोरे यांच्यासमोर आव्हान कायम असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महायुती सोबत मांडलेली चूल आणि डॉ. प्रकाश आंबेडकर यांची संदिग्ध भूमिका यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रात दलित चेहरा हवा होता. हंडोरे यांच्या मागे ताकद उभी करून राज्यात दलित समाजाला एक संदेश देण्याचा काँग्रेसचा यानिमित्ताने प्रयत्न राहणार आहे. इतर दलित नेत्यांच्या तुलनेत हंडोरे हे जमिनीवरचे कार्यकर्ते असून आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची भूमिका नेहमीच वाखण्याजोगी राहिली आहे.

फारसे न बोलता कामावर लक्ष देताना त्यांनी आपल्या चेंबूर परिसरात चांगले काम उभारले आहे. विशेष म्हणजे आंबेडकरी विचारांची शिक्षण संस्था खूप चांगल्या पद्धतीने चालवली आहे. मुंबईत दक्षिण मध्य आणि ईशान्य मुंबई या भागात मोठ्या संख्येने असलेला दलित मतदार त्यांनी चांगला बांधून ठेवला आहे. त्यांना वर्षा गायकवाड यांची चांगली साथ लाभल्यास या दोन्ही भागातून महविकास आघाडीचा उमदेवार निवडून येऊ शकतो.

Chandrakant Handore
Loksabha Election 2024 : लोक खासगीत सांगतात, विद्यमानांना बदला, आवाडेंचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com