आमदार संजय शिंदे कोणाचे ऐकणार? अजितदादांचे की फडणविसांचे!

राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha election 2022) अपक्षांच्या मताला आलीय किंमत
MLA Sanjay Shinde
MLA Sanjay Shindesarkarnama

पुणे : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने सातवा उमेदवार दिल्याने चुरस वाढली आहे. एमआयएमचे धुळ्याचे आमदार फारूख शेख (Farukh Shaikh) यांनी आपल्याला महाविकास आघाडी आणि भाजप या दोन्हींकडून ऑफर असल्याचे सांगत खळबळ उडवून दिली आहे. करमाळ्यातून अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार संजय शिंदे (MLA Sanjay Shinde) यांच्यासह इतर अपक्ष आमदारांचाही भाव वधारला आहे.

भाजपने धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचे आणि संजय शिंदे यांचे साखर कारखानदारीमुळे संबंध आहेत. शिंदे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते कोणाचे ऐकणार, याची उत्सुकता आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

MLA Sanjay Shinde
Video: Sarkarnama Face-Off Full Episode महाराष्ट्रातील राजकारणातील ड्रामा क्वीन कोण? पहा तरुण नेत्यांचा Faceoff

या निवडणुकीतील मतदान हे उघड पद्धतीने होत असले तरी अपक्ष आमदार काय करणार, याच्यावर सारी गणिते अवलंबून आहेत. त्यामुळे या अपक्ष आमदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात स्पर्धा आहे. संजय शिंदे यांनी सरकार स्थापनेवेळी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. मात्र राज्यसभा निवडणुकीत ते काय करणार, याची उत्सुकता राहणार आहे.

महाविकास आघाडीतील संजय राऊत, संजय पवार (शिवसेना), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी) आणि इम्रान प्रतापगढी (काॅंग्रेस) या चारही उमेदवारांसाठी 168 मतांची तंतोतत गरज आहे. यापैकी तीन उमेदवारांना सुरक्षित मतांचा तंतोतंत कोटा दिला तर चौथ्या उमेदवाराला पंधरा मतांची आवश्यकता आहे.

MLA Sanjay Shinde
Sarkarnama open mic : खासदार जलील यांना कठीण प्रश्न आणि त्यांची चपखल उत्तरे

शिवसेनेकडील पाच आमदार असे आहेत की ते एकतर छोट्या पक्षाचे असून सरकारमधे सहभागी आहेत. त्यामुळे पाच मते नक्की मिळतील. पण उरलेल्या दहा अपक्षांपैकी कितीजण मतदान करतील हा प्रश्न आहे. या दहामध्ये बहुजन विकास आघाडीेचे तीन तर याशिवाय संजय शिंदे, चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर ), नरेंद्र भोंडेकर यांचा कल कोणाकडे राहील, याबद्दल आता सांगता येत नाही. दुसरीकडे आशिष जयस्वाल आणि ऐनवेळी मंजुषा गावित आणि गीता जैन हे अपक्ष आमदार स्वयंभूपणे निर्णय घेवू शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com