राज्याच्या महाअधिवक्तापदासाठी आशुतोष कुंभकोणी आणि राम आपटे याची नावे चर्चेत

आशुतोष कुंभकोणी यांनी आघाडी सरकारच्या काळात अतिरिक्त महाअधिवक्ता या पदावर काम केले आहे. मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून त्यांनी काम केले. परंतु प्रोबेशन काळात राजीनामा देऊन पुन्हा प्रॅक्‍टिस सुरू ठेवली होती. राम आपटे हे संघ परिवाराशी निगडित आहेत.
राज्याच्या महाअधिवक्तापदासाठी आशुतोष कुंभकोणी आणि राम आपटे याची नावे चर्चेत

मुंबई : राज्याचे महाअधिवक्ता रोहित देव यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून निवड झाल्याने रिक्त होणाऱ्या या पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे.

ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी आणि राम आपटे यांच्यापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऐनवेळी अन्य कुणाचे नाव पुढे येऊ शकते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. 

मुंबई उच्च न्यायालयात नव्याने पदभार स्वीकारणाऱ्या सहा अतिरिक्त न्यायमूर्तीचा शपथविधी सोमवारी होणार आहे.

यामध्ये रोहित देव यांचाही समावेश आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या महाअधिवक्ता पदासाठी कोणाची निवड होणार याकडे लक्ष लागले आहे. भाजप सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर महाअधिवक्ता पदावर ज्यांची नेमणूक झाली त्या व्यक्ती नागपूरच्या होत्या.

परंतु त्यांना जास्त काळ या पदावर काम करता आले नव्हते. यावेळी नागपूर वगळता अन्य भागातील व्यक्तीची निवड होण्याची शक्‍यता आहे. भाजप सरकारच्या काळात पहिले महाअधिवक्ता म्हणून सुनील मनोहर यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी व्यक्तिगत कारणास्तव राजीनामा दिला होता.

त्यानंतर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. श्रीहरी अणे यांनी या पदावर नेमणूक झाली खरी. परंतु स्वतंत्र विदर्भ आंदोलनात सहभागी झालेल्या अणे यांना सक्तीने राजीनामा द्यावा लागला होता. 


अणे यांच्यानंतर रोहित देव यांनी आठ महिने प्रभारी म्हणून कार्यभाग सांभाळला. परंतु सरकारवर टीका झाल्यानंतर रोहित देव यांच्याकडे महाअधिवक्ता पदाचा पूर्णवेळ कार्यभाग सोपविण्यात आला. देव यांच्यानंतर नागपूरच्या व्यक्तीला पुन्हा आणले जाणार की अन्य व्यक्तिची निवड होणार याची वकीलामध्ये चर्चा आहे. 

आशुतोष कुंभकोणी यांनी आघाडी सरकारच्या काळात अतिरिक्त महाअधिवक्ता या पदावर काम केले आहे. मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून त्यांनी काम केले. परंतु प्रोबेशन काळात राजीनामा देऊन पुन्हा प्रॅक्‍टिस सुरू ठेवली होती. राम आपटे हे संघ परिवाराशी निगडित आहेत. राहुल गांधी यांनी भिवंडीच्या सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदमानी करणारे वक्तव्य केले होते त्या मानहानी करणाऱ्या दाव्याचे वकील म्हणून राम आपटे यांनी न्यायालयात बाजू मांडली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com